अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात सरकारला अपयश: ताम्हणकरांचा आरोप
By पूजा प्रभूगावकर | Published: February 9, 2024 12:02 PM2024-02-09T12:02:47+5:302024-02-09T12:03:08+5:30
Goa Budget 2024: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने कुठलीही घोषणा केलेली नसून हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने कुठलीही घोषणा केलेली नसून हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
खासगी बसेस, टॅक्सी, रिक्शा हे राज्यातील वाहतूक क्षेत्राचा कणा आहे. मात्र त्यांचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात केलेला नाही. खासगी बसेससाठी असलेली इंधन सब्सिडी योजनेची कोटयावधी रुपयांची रक्कम प्रलंबित असून त्याबाबतही सरकारने मौन बाळगल्याची टीका त्यांनी केली.
एका बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन करतात तर मुख्यमंत्री गोव्याला स्वयंपूर्ण बना असे सांगतात. प्रत्यक्षात मात्र या अर्थसंकल्पात खासगी बसमालकांना स्वयंपूर्ण बनवण्याएवजी संपवण्याचाच प्रकार अधिक असल्याचा आरोपही ताम्हणकर यांनी केला.