गाेव्यातील कुंकळ्ळी येथे घरफोडी,चोरट्यांनी सुवर्णलंकार आणि रोकड लांबवली, साडेआठ लाखांचा ऐवज लंपास
By सूरज.नाईकपवार | Published: April 18, 2024 12:14 PM2024-04-18T12:14:48+5:302024-04-18T12:15:05+5:30
Goa Crime News: गोव्यात घरफोडीचे सत्र सुरुच असून, सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोगडीकोट्टो येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन सुवर्णलंकार व रोकड मिळून साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
- सूरज नाईकपवार
मडगाव - गोव्यात घरफोडीचे सत्र सुरुच असून, सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोगडीकोट्टो येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन सुवर्णलंकार व रोकड मिळून साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
ओपेंद्र चंद्रलाल पावल यांनी या चोरी प्रकरणी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. भादंसंच्या ४५७ व ३८० कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले असून, अज्ञाताविरोधात गुन्हा नाेंद केला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत.
बुधवार दि. १७ एप्रिल रोजी रात्री चोरीची वरील घटना घडली. पावल हे भाड्याच्या घरात रहात आहे. अज्ञात चोरटयाने या घराचा मुख्य दरवाजा फोडून आत शीरुन ॲलुमिनियमा बॉक्स चोरुन नेला. यात सोनाच्या ब्रॅसलेट, सोनसाखळी व अन्य दागिने तसेच दोन लाख रुपये होते. चोरटयाने ते घेउन पळ काढला.
चाेरीची घटना उघडकीस आल्यानंतर यासंबधी पोलिसांना माहिती देण्यात आली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. चोरटयांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसेतंज्ञानाही पाचारण करण्यात आले.