कार्निव्हलच्या थिम साँगवर गोव्याचे पर्यटन मंत्री ठेका धरतात तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 01:00 PM2019-02-27T13:00:21+5:302019-02-27T13:07:36+5:30

गोव्यात 2 मार्चपासून कार्निव्हलला आरंभ होत आहे. खा, प्या व मजा करा असा संदेश देणारा कार्निव्हल उत्सव जोरात साजरा करावा असे आवाहन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोमंतकीयांना केले.

Goa Carnival Festival 2019 | कार्निव्हलच्या थिम साँगवर गोव्याचे पर्यटन मंत्री ठेका धरतात तेव्हा

कार्निव्हलच्या थिम साँगवर गोव्याचे पर्यटन मंत्री ठेका धरतात तेव्हा

Next
ठळक मुद्देखा, प्या व मजा करा असा संदेश देणारा कार्निव्हल उत्सव जोरात साजरा करावा असे आवाहन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोमंतकीयांना केले.विविध शहरांतील कार्निव्हलमधील चांगल्या चित्ररथांना एकूण 1 कोटी 63 लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.थिम साँग सादर झाले तेव्हा आजगावकर यांनी या गाण्याची स्तुती केली व हात हलवत गाण्यावर ठेका धरला.

पणजी - गोव्यात 2 मार्चपासून कार्निव्हलला आरंभ होत आहे. खा, प्या व मजा करा असा संदेश देणारा कार्निव्हल उत्सव जोरात साजरा करावा असे आवाहन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोमंतकीयांना केले. त्याचबरोबर कार्निव्हलच्या थिम साँगचे बुधवारी जेव्हा पत्रकार परिषदेत उद्घाटन केले गेले तेव्हा मंत्री आजगावकर यांनी खूश होत गाण्यावर हाताने ठेकाही धरला. विवा कार्निव्हल असे जोरात ओरडून मंत्री आजगावकर यांनी गाण्याचा समारोप केला.

पर्यटन खात्याचे संचालक संजीव गडकर यांच्या उपस्थितीत बोलताना मंत्री आजगावकर म्हणाले, की गोव्याची पारंपरिक संस्कृती आम्हाला कार्निव्हलच्या माध्यमातून देश- विदेशात पोहचवायची आहे. यावेळी प्रथमच जांभियाचे पर्यटन मंत्री व त्यांचे शिष्टमंडळ पणजीत होणाऱ्या कार्निव्हलला उपस्थित राहणार आहे. गोव्याची काजू फेणी, गोव्याची फिश करी, गोव्याच्या पूर्वजांनी सांभाळून ठेवलेल्या परंपरा या सगळ्य़ाचे दर्शन कार्निव्हलमधून जगासमोर मांडायचे आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च पर्यटन खाते करणार आहे.

मंत्री आजगावकर म्हणाले की,  2 मार्चपासून तीन दिवस गोव्यात किंग मोमोची राजवट असेल. खा, प्या व मजा करा असा संदेश किंग मोमो देतो. गोमंतकीयांनी या तीन दिवसांत दुसरा कोणताच ताण डोक्यावर घेऊ नये. 2 मार्चला पणजीला तर 3 मार्चला मडगावमध्ये कार्निव्हलनिमित्ताने चित्ररथ मिरवणूक होईल. 4  मार्च रोजी फोंडा, कुडचडे व वास्कोत कार्निव्हलची मिरवणूक होईल तर 5 मार्च रोजी म्हापसा, शिरोडा व मोरजीत कार्निव्हल होईल.

विविध शहरांतील कार्निव्हलमधील चांगल्या चित्ररथांना एकूण 1 कोटी 63 लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. या शिवाय 1 कोटी 82 लाख रुपये कार्निव्हलसाठीच्या साधनसुविधा, सजावट आणि अन्य कामांवर खर्च केले जातील, असे मंत्री आजगावकर यांनी जाहीर केले. यावेळी थिम साँग सादर झाले तेव्हा आजगावकर यांनी या गाण्याची स्तुती केली व हात हलवत गाण्यावर ठेका धरला.

Web Title: Goa Carnival Festival 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.