Goa: ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी पोलीस वचनबद्ध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं आश्वासन
By काशिराम म्हांबरे | Published: August 21, 2023 06:22 PM2023-08-21T18:22:24+5:302023-08-21T18:22:39+5:30
Goa: गोवा पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहेराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिना निमीत्त म्हापसा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
- काशीराम म्हाबरे
म्हापसा - गोवा पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहेराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिना निमीत्त म्हापसा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमीत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, मनोरंजन कार्यक्रम तसेच सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्ता सांभाळताना जेष्ठ नागरिकांना सहकार्य करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. यावेळी पोलीस महासंचालक जसपाल सिंग , पोलीस महानिरीक्षक, उत्तर गोवा अधिक्षक निधीन वाल्सन, उपअधिक्षक जिवबा दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
गोवा पोलीस सतत जेष्ठ नागरिकांच्या सहकार्यासाठी तत्पर राहणार आहे. घरात एकटे रहात असल्यास पोलिसांचे सहकार्य घ्या असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले. मनुष्याच्या चेहºयावर हास्य आणणे हे सर्वात मोठे काम असते आणि ते या कार्यक्रमातून दाखवून देण्यात आले.आजच्या युवकांनी जेष्ठ नागरिकांकडून शिकून घेणे गरजेचे असून निरोगी तसेच फिट राहण्यासाठी योगा करण्याची मैदानी खेळ खळण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
निधीन वाल्सन यांनी बोलताना पालक आपल्या जिवनात अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. जागतीकी करणाच्या पार्श्वभूमीवर चांगल्या जिव शैलीसाठी स्थलांतरण वाढले आहे. असे असले तरी पार्श्वभुमीवर पालकांची काळजी घेणे गरजेचे आहे असल्याचे ते म्हणाले.