Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंढरपुरात विठ्ठल, रुक्मिणीचे घेतले दर्शन, पंढरपूरमध्ये गोवा 'भक्त निवास' उभारणार
By किशोर कुबल | Published: July 21, 2024 10:23 PM2024-07-21T22:23:59+5:302024-07-21T22:24:39+5:30
Gpa News: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळी पंढरपूर येथे विठ्ठल, रखुमाईचे दर्शन घेतले. गोवेकर भाविक तसेच वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला भेट देत असतात. त्यामुळे लवकरच पंढरपूर येथे गोवेकरांसाठी 'भक्त निवास'उभारू, असे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी जाहीर केले.
- किशोर कुबल
पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळी पंढरपूर येथे विठ्ठल, रखुमाईचे दर्शन घेतले. गोवेकर भाविक तसेच वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला भेट देत असतात. त्यामुळे लवकरच पंढरपूर येथे गोवेकरांसाठी 'भक्त निवास'उभारू, असे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी जाहीर केले.यावेळी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
आळंदी येथून आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचेही दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतले. राज्याच्या विकासासाठी लोकांना आनंदी, सुखी, समाधानी ठेव, अशी प्रार्थना सावंत यांनी केली.मुख्यमंत्र्यांसोबत एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर हेही पंढरपुरात आहेत.