गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलं उज्जैनमधील महाकालेश्वरराचं दर्शन

By किशोर कुबल | Published: September 11, 2023 03:55 PM2023-09-11T15:55:34+5:302023-09-11T15:55:57+5:30

Goa: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी मध्यप्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते.

Goa Chief Minister Pramod Sawant visited Mahakaleshwarara in Ujjain | गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलं उज्जैनमधील महाकालेश्वरराचं दर्शन

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलं उज्जैनमधील महाकालेश्वरराचं दर्शन

googlenewsNext

- किशोर कुबल 
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी मध्यप्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते.

दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, ‘ बाबा महाकालकडे गोवेकरांना आरोग्य व गोव्याच्या विकासाबरोबरच भरभराटीसाठी मी प्रार्थना केली आहे. गेला बराच काळ या मंदिराला भेट देण्याची इच्छा होती. ती पूर्ण झाली.’

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर भाजपने म.प्र.मधील विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत काही जबाबदाय्रा सोपवल्या आहेत. त्या अनुषंगाने ते तेथे काही नेत्यांच्या बैठका घेऊन चर्चा करतील. नुकतीच त्यांनी वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट दिली होती. मध्य प्रदेश तसेच अन्य चार मिळून पाच राज्यांच्या विधानसभा निकट आहेत.

Web Title: Goa Chief Minister Pramod Sawant visited Mahakaleshwarara in Ujjain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.