गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा आयआयएम विद्यार्थ्यांशी संवाद, स्टार्टप गोवासाठी निमंत्रण
By वासुदेव.पागी | Published: December 16, 2023 03:57 PM2023-12-16T15:57:15+5:302023-12-16T15:58:06+5:30
या विद्यार्थ्यांना गोव्यात स्टार्टप इकोसिस्टीममध्ये सहभागी होण्यासाठी आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मेनेजमेन्टच्या विद्यार्थ्यांशी आणि प्राचार्यवर्गाशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांना गोव्यात स्टार्टप इकोसिस्टीममध्ये सहभागी होण्यासाठी आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
या आएएमएममध्ये आयोजित केलेल्या ‘आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत आणि ५ ट्रिलियन डॉलर अर्थ व्यवस्थेच्या उद्धीष्ठासाठी तरुणांची भूमिका’ या विषयावरील झिरो माईल संवादात विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील स्वयंपूर्ण गोवा योजनेची माहिती दिली. तसेच. या योजनेशी पूरक असलेल्या गोव्यात सुरू करण्यात आलेल्या स्टार्टप योजनेचीही माहिती दिली.
या ‘योजनेत तुम्हीही सहभागी होऊ शकता, गोवा तुमचे यासाठी स्वागत करीत आहे’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले. ते म्हणाले की नागपूर आयआऐयएमचे देशाच्या विकासात फार मोठे योगदान आहे. तुमच्या विद्धवत्तेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशापुढे ठेवलेले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यास उपयोग होवू द्या असे ते म्हणाले.