गोवा : सिलिंडर स्फोटातून मुलांचा थोडक्यात बचाव, घरातील मोठी मंडळी कामानिमित्त होती बाहेर
By वासुदेव.पागी | Published: November 28, 2023 04:43 PM2023-11-28T16:43:25+5:302023-11-28T16:44:32+5:30
हीटर ठरला स्फोटाचं कारण
पणजीः सोमवारी रात्री भाटले आल्तिनो येथील एका घरात झालेल्या सिलिंडर स्फोटात घरातील लहान मुलांचा थोडक्यात बचाव झाला. हीटर बंद न करणे हे या स्फोटाचे कारण ठरले.
ही घटना सोमवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पणजीत भाटले येथील सरकारी सदनिकेत ही दुर्घटना घडली. घरातील मोठी मंडळी कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यांची लहान मुले घरातच होती. परंतु जेव्हा हा स्फोट घडला त्यावेळी मुले थोडी दूर होती आणि त्यामुळे त्यांचा बचाव झाला. दोघीही सुरक्षित आहेत.
घरात पाणी गरम करण्यासाठी हीटर लावण्यात आला होता. हीटर बंद करण्यास मुले विसरली. त्यामुळे हीटर अधीक तापून जवळच्या वॉशिंग मशीनला लागला आणि ते जळून खाक झाले. तसेच जळणाऱ्या वशिंग मशीनमुळे सिलिंडर तापला आणि त्याचा स्फोट झाला. त्यानंतर अग्नीशामक दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर या दळाच्या जवानाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.