पाकमधील ख्रिस्ती ज्येष्ठाला गोव्यात नागरिकत्व; CAA अंतर्गत राज्यातील पहिला मानकरी
By किशोर कुबल | Published: August 28, 2024 12:56 PM2024-08-28T12:56:21+5:302024-08-28T12:56:41+5:30
गोवा मुक्तीपूर्वी पाकिस्तानात झाला होता स्थलांतरित
पणजी : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए) नागरिकत्व मिळवणारा पाकिस्तानमधील ख्रिस्ती ज्येष्ठ नागरिक राज्यातील पहिला नागरिक ठरला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज बुधवारी नागरिकत्व प्रमाणपत्र बहाल करण्याचा कार्यक्रम झाला. जोझेफ फ्रान्सिस परैरा या प्रस्तुत नागरिकाचा जन्म गोवा पोर्तुगीज राजवटीत असताना झाला आणि नंतर तो १९६१ मध्ये मुक्तीपूर्वी पाकिस्तानात स्थलांतरित झाला. वयाची सत्तरी ओलांडलेला हा ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह सध्या दक्षिण गोव्यात कांसावली येथे राहत आहे. गोव्यातील महिलेशी लग्न झाल्यानंतर तो येथे आला.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, 'आम्ही यापुढेही सीएए अंतर्गत पात्र व्यक्तींना नागरिकत्व प्रमाणपत्रे बहाल करण्याचा कार्यक्रम चालूच ठेवू.'