गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राष्ट्रीय बैठकीत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2024 08:32 IST2024-10-18T08:31:39+5:302024-10-18T08:32:02+5:30
या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहिले आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राष्ट्रीय बैठकीत सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक चंदिगडमध्ये होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय मंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला डॉ. सावंत यांच्याबरोबरच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री सावंत उपस्थित आहेत.