CoronaVirus News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 11:11 AM2020-09-02T11:11:37+5:302020-09-02T11:41:00+5:30

प्रमोद सावंत यांनी ट्विट करून दिली कोरोनाची लागण झाल्याची माहिती

Goa CM Pramod Sawant tests positive for coronavirus | CoronaVirus News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

CoronaVirus News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

Next

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आपण होम आयसोलेशनमध्ये राहणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.

'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र माझ्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत. त्यामुळे मी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी घरातूनच माझं काम करेन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आवश्यक ती काळजी घ्यावी,' असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



गोव्यात काल कोरोनाचे ५८८ नवे रुग्ण आढळून आले. राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत १८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून १९४ जणांनी जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत १३ हजार ५७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. काल दिवसभरात २७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

जन्माला आलेला माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही- प्रकाश आंबेडकर

आणखी ३ महिने तरी कोरोना जाणार नाही; सरकारने घेतला आता मोठा निर्णय

Read in English

Web Title: Goa CM Pramod Sawant tests positive for coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.