गोवा : क्षुल्लक कारणावरून प्रियकराची प्रेयसीला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 18:39 IST2024-06-13T18:38:21+5:302024-06-13T18:39:28+5:30
झालेल्या वादात प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीच्या डोक्यावर अवजड वस्तूने जोरदार प्रहार केला.

गोवा : क्षुल्लक कारणावरून प्रियकराची प्रेयसीला मारहाण
काशिराम म्हांबरे -
म्हापसा - क्षुल्लक कारणावरून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या डोक्यावर अवजड वस्तू मारून घटना स्थळावरून पळ काढण्याचा प्रकार म्हापसा पोलीस स्थानच्या हद्दीत गिरी येथे घडला आहे.
वास्को शहरातील हे युगूल जोडपे आपल्या गाडीतून म्हापसा शहराच्या दिशेने प्रवास करीत होते. प्रवासा दरमयान हे जोडपे ग्रीन पार्क हॉटेलनजीक पोहचले असता गाडीतच दोघात वाद निर्माण झाला. झालेल्या वादात प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीच्या डोक्यावर अवजड वस्तूने जोरदार प्रहार केला. करण्यात आलेल्या प्रहारातून प्रेयसीच्या डोक्यावर जबर जखम झाली. तसेच त्यातून रक्त वाहण्यास आरंभ झाला. रक्त येत असल्याचे पाहून घाबरलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला जखमी अवस्थेत तेथेच टाकून घटना स्थळावरून पळ काढला. त्यानंतर स्थानीकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या प्रेयसीला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून नंतर गोवा वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले. निरीक्षक निखील पालयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियकाराचा शोध घेण्याचे काम आरंभण्यात आले आहे.