गोव्याच्या दाबोळी विमानतळावर महिलेकडून १८ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 05:12 PM2019-02-11T17:12:19+5:302019-02-11T17:24:08+5:30

गोव्याच्या दाबोळी विमानतळावर सोमवारी (11 फेब्रुवारी) पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडिया विमानातील एका महिला प्रवाशाकडून येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 लाख 8 हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले.

Goa Customs Officers Arrest Woman Passenger for Hiding 590 gm of Gold Paste in Her Waistband | गोव्याच्या दाबोळी विमानतळावर महिलेकडून १८ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

गोव्याच्या दाबोळी विमानतळावर महिलेकडून १८ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

Next

वास्को - गोव्याच्या दाबोळी विमानतळावर सोमवारी (11 फेब्रुवारी) पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडिया विमानातील एका महिला प्रवाशाकडून येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 लाख 8 हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. या महिला प्रवाशावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने दाबोळी विमानतळावर तिची कसून तपासणी केली. यादरम्यान, महिलेकडे तस्करीचे सोने पेस्ट पद्धतीने एका पाकिटात आपल्या कमरेला बांधून आणल्याचे उघड झाले.  तिला ताब्यात घेऊन कस्टम कायद्यांतर्गत सोने जप्त केले.

दाबोळी विमानतळावर येणार असलेल्या एका आंतरराष्ट्रीय विमानातून तस्करीचे सोने येणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळताच त्यांनी सापळा रचला. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया (एआय ९९४) विमानातील प्रवाशांची येथे तपासणी करण्यात येत असताना कस्टम विभागाला एका महिला प्रवाशाच्या हालचालीवर संशय आल्याने तिची येथे कसून तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपल्या कमरेला एक पाकीट बांधून आणल्याचे दिसून आल्यानंतर ते काढून पाकिटाची तपासणी केली असता यात ‘पेस्ट’ पद्धतीत ५९० ग्रॅम सोने असल्याचे उघड झाले.

यानंतर कस्टम विभागाने याबाबत त्या महिलेशी कसून तपासणी केली असता हे सोने तस्करीने आणल्याचे स्पष्ट झाल्याने सदर सोने कस्टम कायद्याखाली जप्त करण्यात आले. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे कमिश्नर आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकमिश्नर डॉ. राघवेंद्र पी व इतर कस्टम अधिका-यांनी सदर कारवाई केली. हे सोने दाबोळी विमानतळावर आणल्यानंतर येथून ते कुठे नेण्यात येणार होते याबाबत कस्टम अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

एप्रिल २०१८ ते आतापर्यंत दाबोळीवर कस्टम अधिका-यांनी केले २ कोटी ३६ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

गोव्याच्या दाबोळी विमानतळावर कस्टम अधिका-यांनी विविध कारवाई करत एप्रिल २०१८ ते अद्यापपर्यंत अशा आर्थिक वर्षाच्या काळात विविध प्रवाशांकडून एकूण २ कोटी ३६ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी उपलब्ध केली आहे. याबरोबरच या आर्थिक वर्षाच्या काळात दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी विविध कारवाईत बेकायदेशीररित्या प्रवाशांकडून नेण्यात येत असलेली ६७.५ लाख रुपये किंमतीची विविध विदेशी चलनेसुद्धा जप्त केली असल्याची माहिती उघड झालेली आहे.



 

Web Title: Goa Customs Officers Arrest Woman Passenger for Hiding 590 gm of Gold Paste in Her Waistband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.