गोवा : दिया सिनारीची जामीनवर सुटका
By admin | Published: July 19, 2016 07:34 PM2016-07-19T19:34:18+5:302016-07-19T19:34:18+5:30
आमोणे येथील रतन करोल खून प्रकरणातील एक आरोपी आणि मुख्य आरोपी दत्तगुरू सिनारी याची पत्नी दिया सिनारी हिला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 - आमोणे येथील रतन करोल खून प्रकरणातील एक आरोपी आणि मुख्य आरोपी दत्तगुरू सिनारी याची पत्नी दिया सिनारी हिला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ५ महिने व ८ दिवसांनी ती तुरुंगातून बाहेर आली आहे, तर तिचे पती दत्तगुरू सिनारी आणि त्यांचा ड्रायव्हर किशोर महतो हे अजून तुरुंगात आहेत.
आमोणे येथे उसाच्या रसाचा धंदा करणाऱ्या रतन करोलचे शुल्लक कारणासाठी अपहरण करून व नंतर त्याचा खुन करणाऱ्या दत्तगुरू सिनारी आणि त्याचा दिवंगत बंधु देविदास सिनारी यांना मदत केल्याचा दियावर आरोप होता. खुनासाठी वापरलेले सुरे नष्ट करण्याचे काम तिने केले हते. करोलच्या पोटात घुसविलेला सुरा आणि त्याच्या शरिराचे तुकडे केरण्यासाठी वापरलेला सुरा हे दोन्ही सुरे नष्ट करण्यासाठी दियाने प्रयत्न केले होते असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. आपली जामीन वर सुटका करावी ही मागणी मागताना पणजी सत्र नयालयात दाद मागितली होती. परंत तिथे तिचा अर्ज फेटाळल्यामुळे तिने खालच्या न्यायालयाला पणजी खंडपठात आ्व्हान दिले होते. तिच्या याचिकेवर सुनावणी होवून मंगळवारी निवाडा जाहीर करण्यात आला. दिया याप्रकरणातील मुख्य आरोपी नाही आणि तिच्यावर प्रत्यक्ष खुनाचाही आरोप नाही, शिवाय ती एक स्त्री आहे आणि स्थानिक आहे हे मुद्दे तिला जामीन मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
रतन करोलचा खून दत्तगुरु सिनारी आणि देविदास सिनारी बंधुने केला होता. सज्या दिवशी खून झाला होता त्या दिवशी दत्तगुरू सिनारी याने आपल्या पत्नीला म्हणजे दियाला रात्री ९.३० वाजता फोन केला होता. त्यानंतर पाउणे दहाच्या सुमारास दियाने दत्तगुरूला फोन केला होता. ही माहिती दत्तगुरुने कॉल डिटेल्समधून मिळविली होती. तेथेच दियाचा या खून प्रकरणाशी संबंध उघडकीस आले होते. हे सर्व तिने मुख्य आरोपी दत्तगुरूच्या सांगण्यावरून केले होते.