धार्मिक तेड करणाऱ्या कारवाया केल्या तर खबरदार- गोवा डीजीपींचा इशारा
By वासुदेव.पागी | Published: October 3, 2023 07:15 PM2023-10-03T19:15:16+5:302023-10-03T19:15:28+5:30
पणजी: धार्मिक तेड निर्माण करणाऱ्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ जसपाल सिंग सिंग ...
पणजी: धार्मिक तेड निर्माण करणाऱ्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ जसपाल सिंग सिंग यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून धार्मिक भावना दुखविण्याचे पोस्ट सोशल मिडियावर पसरविण्याचे काम चालू असल्याचे आढळून आले आहे. हे काम पद्धतशीरपणे केवळ राज्यातील शांतता बिघडविण्यासाठीच केली जात असल्याचेही स्पष्ट होत आहे. कारण एक दिवस मुस्लीम धर्मियांच्या दैवताच्या विरोधात पोस्ट शेअर होतो तर दुसऱ्या दिवशी हिंदु धर्मियांच्या दैवतांविरुद्ध पोस्ट सोशल मिडियावर केला जातो. जेणे करून धार्मिक संघर्ष होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल , असे डॉ सिंग यांनी म्हटले आहे.
प्रेशित महंमद यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट नंतर मुस्लीम धर्मियांनी राज्यातील अनेक पोलीस स्थानकात ठिय्या मारून निषेध नोंदविला होता तर श्रीरामाच्या विरोधात पोस्ट शेअर केल्यानंतर हिंदु संघटनांनी फोंड्यात निदर्शने केली होती. अशी प्रकरणे पोलीस यापुढे कठोरपणे हाताळतील असे डॉ सिंग यांनी म्हटले आहे. असे प्रकार आढळून आल्यास त्वरित त्याची पोलिसांना माहिती द्यावी असे डॉ सिंग यांनी म्हटले आहे.