Goa: दिपाली गुरसाळे, प्रशांत कोळी यांनी मोडला राष्ट्रीय विक्रम, वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक

By समीर नाईक | Published: October 25, 2023 11:10 PM2023-10-25T23:10:59+5:302023-10-25T23:11:14+5:30

37th National Games: महाराष्ट्राच्या दीपाली गुरसाळे आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाच्या (एसएससीबी) प्रशांत कोळी यांनी बुधवारी (दि. २५) येथील कांपाल स्पोर्ट्स व्हिलेज येथे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नवीन राष्ट्रीय विक्रम रचून सुवर्णपदक पटकावले.

Goa: Dipali Gursale, Prashant Koli break national record, win gold medal in weightlifting | Goa: दिपाली गुरसाळे, प्रशांत कोळी यांनी मोडला राष्ट्रीय विक्रम, वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक

Goa: दिपाली गुरसाळे, प्रशांत कोळी यांनी मोडला राष्ट्रीय विक्रम, वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक

- समीर नाईक 
पणजी - महाराष्ट्राच्या दीपाली गुरसाळे आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाच्या (एसएससीबी) प्रशांत कोळी यांनी बुधवारी (दि. २५) येथील कांपाल स्पोर्ट्स व्हिलेज येथे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नवीन राष्ट्रीय विक्रम रचून सुवर्णपदक पटकावले.

महिलांच्या ४५ किलो गटात, गुरसाळेने स्नॅचमध्ये ७५ किलोच्या तिसऱ्या लिफ्टसह राष्ट्रीय गुण सुधारला आणि एकूण १६५ किलो वजन उचलून राष्ट्रीय खेळांच्या या आवृत्तीत महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पश्चिम बंगालच्या चंद्रिका तरफदारने क्लीन अँड जर्कचा राष्ट्रीय विक्रम मोडून रौप्य तर तेलंगणाच्या टी. प्रिया दर्शिनीने कांस्यपदक पटकावले.

सांगली जिल्ह्यातील गुरसाळेने कोमल कोहरचा ७४ किलो वजनाचा स्नॅचचा विक्रम आणि झिल्ली दलाबेहराचा १६४ किलो वजनाचा विक्रम मोडला. चंद्रिका तरफदारने झिल्लीचा ९४ किलो वजनाचा क्लीन अँड जर्क विक्रमही मोडला. प्रशांत कोळी याने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या मुकुंद आहेरला स्नॅचमध्ये एक किलोग्रॅमने पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. त्याने एकूण २५३ किलो (स्नॅचमध्ये ११५ आणि सी अँड जेमध्ये १३८) वजन उचलून सर्व्हिसेस टॅलीमध्ये दुसरे सुवर्णपदक मिळवले. आंध्र प्रदेशच्या एस. गुरु नायडूने कांस्यपदक जिंकले.

महिलांच्या ४९ किलो गटात ज्ञानेश्वरी यादवने एकूण १७७ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. हरियाणाच्या प्रीतीने एकूण १७४ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवले. तर ४५ किलोग्रॅममध्ये माजी आशियाई चॅम्पियन झिली दलबेहराने १६७ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.

अन्य खेळामध्ये हरियाणाने काम्पाल बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियममध्ये दोन्ही नेटबॉल सुवर्णपदके जिंकून पदक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. हरियाणाच्या पुरुष संघाने केरळचा ४५-४२ असा चुरशीच्या लढतीत पराभव करून सुवर्णपदक पटकावले. तर महिलांनी कर्नाटकचा ५८-५२ असा धुव्वा उडवला. पुरुषांच्या कांस्यपदकाच्या सामन्यात जम्मू आणि काश्मीर आणि दिल्ली यांनी ७३ -७३ असा रोमांचक बरोबरी साधून संयुक्त विजेता घोषित केले. महिलांच्या कांस्यपदकाच्या लढतीत दिल्ली आणि तेलंगणा यांनाही सामना ६४-६४ असा बरोबरीत संपल्यानंतर संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर महिला रग्बी ७ मध्ये आघाडीवर असलेल्या ओडिशाच्या महिलांनी अ गटात पहिल्या सामन्यात ५२३ -० ने गोव्यावर वर्चस्व राखले. चौथ्या मानांकित केरळने अ गटामध्ये बिहारचा ४०-५ असा पराभव केला. ब गटात द्वितीय मानांकित महाराष्ट्राने कर्नाटकचा ४८-० असा पराभव केला तर पश्चिम बंगालने दिल्लीचा ३८-१० असा पराभव केला. पुरुषांच्या सामन्यांमध्ये, हरियाणाने गोव्याचा ३१-० ने पराभव केला. गटातील अन्य सामन्यात, ओडिशाने केरळवर १५-१२ अशी मात करून विजयासह सुरुवात केली. ब गटात पश्चिम बंगालने पंजाबचा १९-७ तर महाराष्ट्राने बिहारचा १९-१२ असा पराभव केला.

अन्य सामने

नेटबॉल :
पुरुषांची अंतिम फेरी : हरियाणाने केरळला ४५-४२ ने हरवले
पुरुषांचे कांस्यपदक : जम्मू आणि काश्मीर दिल्ली – ७३-७३ अशी बरोबरी
महिला अंतिम फेरी : हरियाणाने कर्नाटकचा ५८-५२ असा पराभव केला.
महिला कांस्यपदक : दिल्लीने तेलंगणाशी ६४-६४ अशी बरोबरी

भारोत्तोलन महिला ४५ किलोग्रॅम
सुवर्ण – दीपाली गुरसाळे (महाराष्ट्र) – स्नॅच – ७५ किलो, क्लीन अँड जर्क – ९० किलो, एकूण – १६५ किलो
रौप्य - चंद्रिका तरफदार (पश्चिम बंगाल) - स्नॅच - ६७ किलो, क्लीन अँड जर्क - ९५ किलो, एकूण - १६२ किलो
कांस्य – टी. प्रिया दर्शिनी (तेलंगणा) – स्नॅच – ६९ किलो, क्लीन अँड जर्क – ९२ किलो, एकूण – १६१ किलो

पुरुष : ५५ किलोग्रॅम
सुवर्ण – प्रशांत कोळी (एसएससीबी) – स्नॅच- ११५ किलो, क्लीन अँड जर्क- १३८ किलो, एकूण- २५३ किलो
रौप्य - मुकुंद आहेर (महाराष्ट्र) - स्नॅच - १२ किलो, क्लीन अँड जर्क - १३७ किलो, एकूण - २४९ किलो
कांस्य – एस. गुरु नायडू (आंध्र प्रदेश) – स्नॅच- १०४ किलो, क्लीन अँड जर्क- १२६ किलो, एकूण- २३० किलो

महिला ४९ किलो
सुवर्ण – ज्ञानेश्वरी यादव (छत्तीसगड) – स्नॅच- ८० किलो, क्लीन अँड जर्क- १०१ किलो, एकूण – १७७ किलो
रौप्य - प्रीती (हरियाणा) - स्नॅच - ८१ किलो, क्लीन अँड जर्क - १०० किलो, एकूण - १७४ किलो
कांस्य – झिल्ली दलाबेहेरा (ओडिशा) – स्नॅच- ७६ किलो, क्लीन अँड जर्क- ९६ किलो, एकूण- १६७ किलो

रग्बी
महिला गट- अ : ओडिशा - गोवा - ५२-० , केरळ- बिहार - ४०-५
ब गट : महाराष्ट्र - कर्नाटक – ४८-०, पश्चिम बंगाल - दिल्ली –३८-१०

पुरुष
गट अ : हरियाणा विरुद्ध गोवा – ३१-०, ओडिशा- केरळ – १५-१२
ब गट : पश्चिम बंगाल विरुद्ध पंजाब – १९-७, महाराष्ट्र- बिहार – १९-१२

बास्केटबॉल
महिला
गट अ: केरळ - गोवा -८९-१९.

Web Title: Goa: Dipali Gursale, Prashant Koli break national record, win gold medal in weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा