Coronavirus: "महाराष्ट्राप्रमाणे गोव्याला अत्यंत कडक एसओपीची गरज नाही, पण..."
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 06:21 PM2020-11-24T18:21:56+5:302020-11-24T19:45:08+5:30
आम्ही थर्मल छाननीवर भर दिला आहे. विमानातून व रेल्वेतून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांची थर्मल छाननी केली जाईल.
पणजी : राज्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात खूप थंडी असते. त्यामुळे या दोन महिन्यांत गोमंतकीयांना अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण थंडीत कोविडचा प्रसार वाढत असतो, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ओनलाईन बैठक घेतली. जानेवारीनंतर कोविडवरील लस येईल, असे पंतप्रधानांनी नमूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. गोव्यात कोविडची स्थिती नियंत्रणात आहे.तरीही खूप काळजी घ्यावी लागेल. मास्क वापरणे, सोशल डिस्टनसींग आदी नियमांचे पालन करावेच लागेल. थंडी वाढते तेव्हा कोविडचे विषाणू वाढतात. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीत गोमंतकीयांना सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्याला अत्यंत कडक एसओपीची गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आम्ही थर्मल छाननीवर भर दिला आहे. विमानातून व रेल्वेतून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांची थर्मल छाननी केली जाईल. प्रवाशांना सध्या वेगळी एसओपी नको. सर्व होटेलांना आम्ही थर्मल छाननीचा वापर पर्यटकांसाठी करा असे सांगितली आहे. किनारी भागांमध्ये जे कुणी पार्टया करतात, किंवा क्लब चालवतात तिथे सोशल डिस्टनसींगचे पालन करायलाच हवे. मास्क न वापरणाऱ्यां दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्याची सूचना आम्ही पोलिसांना केली आहे. ते पार्ट्या व क्लबच्या परिसरातही पाहणी करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.