गोव्यात नरकासुराचे दहन करून दिवाळी साजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 12:55 PM2018-11-06T12:55:09+5:302018-11-06T13:02:42+5:30
दक्षिण गोव्याच्या अनेक भागांमध्ये रात्री बाराच्या सुमरास मुख्य चौकातून नरकासूर पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
पणजी - दिवाळीच्या निमित्ताने नरकासुराच्या आक्राळ- विक्राळ प्रतिमा गोव्यात सोमवारी (5 नोव्हेंबर) ठिकठिकाणी पाहायला मिळल्या होत्या. दक्षिण गोव्याच्या अनेक भागांमध्ये रात्री बाराच्या सुमारास मुख्य चौकातून नरकासूर पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तसेच आजही नरकासुराचे पुतळे जाळण्यात आले आणि फटाके फोडून उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली.
Goa: Effigies of Narakasura burnt on the occasion of Naraka Chaturdashi in Panaji, early morning today #diwalipic.twitter.com/1wUrZVDaMY
— ANI (@ANI) November 6, 2018
गोव्यामध्ये नरकासुराच्या देखाव्यासाठी अनेक मंडळांमध्ये चढाओढ पाहायला मिळली आहे. दिवाळीच्या पहाटे म्हणजेच मंगळवारी नरकासुराच्या प्रतिमांचे दहन करून गोव्यात दिवाळीचं स्वागत करण्यात आलं. माणसातील वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा, असा या मागचा हेतू असतो.