Goa: बहिणीला शाळेत सोडण्यास जाताना मोठी बहीण रस्ता अपघातात ठार
By पूजा प्रभूगावकर | Published: December 12, 2023 01:02 PM2023-12-12T13:02:30+5:302023-12-12T13:02:55+5:30
Goa Accident News: आपल्या लहान बहिणीला दुचाकीवरुन शाळेत सोडण्यास जाणाऱ्या संजना सावंत (२२) ही युवती शिरदोण येथे मंगळवार सकाळी विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ठार झाली.
- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी - आपल्या लहान बहिणीला दुचाकीवरुन शाळेत सोडण्यास जाणाऱ्या संजना सावंत (२२) ही युवती शिरदोण येथे मंगळवार सकाळी विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ठार झाली.
या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेली संजना हिची लहान बहीण व अपघातातील अन्य दुचाकीस्वार ओमकार आरोसकर हे दोघे जखमी झाले आहेत.या दोघांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. या अपघात प्रकरणी आगशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
प्राप्त माहितीनुसार संजना हिची लहान बहीण ही पिलार येथील उच्च माध्यमिक मध्ये शिकत आहे. संजना ही आपल्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरुन सकाळी घरातून निघाली. यावेळी तिची लहान बहीण दुचाकीच्या मागे बसली होती. शिरदोण येथील जुन्या पुला जवळ पोहचताच विरुध्द दिशेने ओमकार आरोसकर हा युवक हा आपल्या मोटारसायकलने येत होता. यावेळी सदर मोटारसायकलची धडक संजना हिच्या दुचाकीला बसली. सदर धडक ही इतकी जबरदस्त होती की संजना व तिची बहीण रस्त्यावर कोसळली.यात संजना हिचे डोके रस्त्यावर आपटल्याने ती जागीच ठार झाली.