Goa: गोव्यातील वयस्कर महिलेचे निधन

By काशिराम म्हांबरे | Published: September 18, 2023 11:11 AM2023-09-18T11:11:20+5:302023-09-18T11:12:00+5:30

गोव्यातील सर्वात वयस्कर १११ वर्षीय महिला माटिल्डा डिसोझा हिचेरविवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. कळंगुट मतदार संघातील कांदोळी पंचायत क्षेत्रातल्या त्या रहिवासी होत्या.

Goa: Elderly woman passes away in Goa | Goa: गोव्यातील वयस्कर महिलेचे निधन

Goa: गोव्यातील वयस्कर महिलेचे निधन

googlenewsNext

  - काशीराम म्हांबरे 
गोव्यातील सर्वात वयस्कर १११ वर्षीय महिला माटिल्डा डिसोझा हिचेरविवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. कळंगुट मतदार संघातील कांदोळी पंचायत क्षेत्रातल्या त्या रहिवासी होत्या.  ‘माट्टी ‘ या टोपण नावाचे परिचीत असलेल्या माटिल्डा यांचा जन्म २५ आॅक्टोबर १९११ साली झालेला.
मागील काही दिवसापासून त्या आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आरंभी त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यात ठेवण्यात आले होते. तेथून नंतर म्हापशातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. सुरु असलेल्या उपचारासाठी प्रतिसाद न लाभल्याने त्यातच त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर उद्या १९ सप्टेंबर रोजी कळंगुट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पुर्वी कळंगुट येथील सेंट अ‍ॅलेक्स चर्चीत प्रार्थना सभा संपन्न होणार आहे. माटिल्डा हिच्या जेष्ठ पूत्राचे काही वर्षा पूर्वी निधन झाले होते. सध्या त्यांच्या पश्चात दोन पूत्र, दोन मुली, नातवंडे पणतुरे असा परिवार आहे.
गेल्या वर्षी त्यांचा १११ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आमदार मायकल लोबो कळंगुटचे सरपंच जोझफ सिक्वेरा तसेच इतरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेला.  

Web Title: Goa: Elderly woman passes away in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा