Goa Election 2022: “शिवसेनेचा दरारा काय असतो, हे आता गोवेकरांना कळायला लागलंय”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 06:17 PM2022-02-11T18:17:29+5:302022-02-11T18:19:07+5:30

Goa Election 2022: शिवसेना प्रत्येक निवडणूक लढणार आणि जिंकणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी गोव्यात व्यक्त केला.

goa election 2022 aaditya thackeray visit goa for campaigning for shiv sena candidate | Goa Election 2022: “शिवसेनेचा दरारा काय असतो, हे आता गोवेकरांना कळायला लागलंय”: आदित्य ठाकरे

Goa Election 2022: “शिवसेनेचा दरारा काय असतो, हे आता गोवेकरांना कळायला लागलंय”: आदित्य ठाकरे

Next

वास्को: गोवा विधासभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर वातावरण तापत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांचे स्टार प्रचारक गोव्यात येऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी गोव्यातील वास्को येथे एका जनसभेला संबोधित केले. आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर असून, शिवसेना उमेदवारांसाठी ते प्रचार करणार आहेत. यावेळी वास्कोवासीयांशी संवाद साधताना शिवसेनेचा दरारा काय असतो, ते आता गोव्यातील राजकारणाला कळायला लागले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

जनतेच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना वर्षानुवर्षे नागरिकांचा विश्वास आपल्या कार्यातून जिंकत आली आहे आणि जिंकत राहील. या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा जनसेवेसाठी झटणारा शिवसैनिक आपल्यासाठी उभा आहे. गोव्याशी आपले वेगळे नाते आहे. कित्येक जणांचे कुलदैवत, मंदिरे, गाव, घरे इथे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसे सांगितलेले आहे की, भूमिपुत्रांना न्याय द्या, तेच काम आपण इथे करण्यासाठी आलेलो आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

शिवसेना आली म्हणजे नक्की काय असते, ते आता कळेल

शिवसेनेचा दरारा काय असतो, शिवसेना आली म्हणजे नक्की काय असते, हे या गोव्याच्या राजकारणाला आता कळायला लागलेले आहे. जरी आपले महाराष्ट्रात राज्य असेल, सरकार असेल आपण सगळे प्रचारासाठी तिथून आलेलो असू, तरी जेव्हा गोवाबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण प्राधान्य स्थानिक गोवेकरांना देणार आहोत. हा तुम्हाला शब्द देण्यासाठी आलेलो आहे, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. 

शिवसेना म्हणून एक आपले धोरण आहे 

शिवसेना म्हणून एक आपले धोरण आहे. प्रत्येक राज्य, जिल्हा, शहर, गाव तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यायाचा म्हणजे नेमके काय करायच? हे शिवसेनेकडून समजून घेतले पाहिजे. मी एकच सांगू इच्छितो की, ही आपली सुरूवात आहे. प्रत्येक निवडणूक आपण लढूच, पण मला खात्री आहे की, प्रत्येक निवडणूक लढणार आणि जिंकणार. तुमचा आमच्यावरील विश्वास आणखी घट्ट होत जाणार. गोव्यात प्रचारासाठी नाही तर आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा घेण्यासाठी आलोय. आपल्या जे नवीन गोवा निर्माण करायचे आहे ते आपल्या आशीर्वादाने असेल आणि आपल्यासाठी असेल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: goa election 2022 aaditya thackeray visit goa for campaigning for shiv sena candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.