Goa Election 2022: आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आज ठरणार; गोव्यात आणखी पाच उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:37 AM2022-01-19T09:37:19+5:302022-01-19T09:39:20+5:30
Goa Election 2022: आम आदमी पक्ष आज आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को : आम आदमी पक्ष आज आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी रात्री दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर ही माहिती दिली.
आम आदमी पक्षाने काल पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला आहे. आप गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार हा भंडारी समाजातील देईल असे यापूर्वी मनीष सिसोदिया यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आज अमित पालेकर, महादेव नाईक, रामराव वाघ की अन्य कुणाचे नाव जाहीर केले जाईल, याकडे आप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, दाबोळी विमानतळावर केजरीवाल यांच्या स्वागतासाठी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
आणखी पाच उमेदवार जाहीर
आम आदमी पार्टीने आपले आणखी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यात मडगावात लिंकोन वाझ, प्रियोळ मतदारसंघात नोनू नाईक, कुडचडे मतदारसंघात गाब्रिएल फर्नांडिस, केपे मतदारसंघात राहल परेरा आणि साखळीत मनोज आमोणकर यांना पक्षाने उमेदवारी जारी केल्या
आहेत.