Goa Election 2022: “उत्पल पर्रिकर आम आदमी पक्षात आल्यास स्वागतच”; अरविंद केजरीवालांची खुली ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 01:32 PM2022-01-16T13:32:46+5:302022-01-16T13:33:43+5:30

Goa Election 2022: माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

goa election 2022 arvind kejriwal said if utpal parrikar desired we welcomed in aam aadmi party | Goa Election 2022: “उत्पल पर्रिकर आम आदमी पक्षात आल्यास स्वागतच”; अरविंद केजरीवालांची खुली ऑफर?

Goa Election 2022: “उत्पल पर्रिकर आम आदमी पक्षात आल्यास स्वागतच”; अरविंद केजरीवालांची खुली ऑफर?

Next

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकांच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत असून, काँग्रेससह तृणमूलनेही कंबर कसल्याचे चित्र आहे. मात्र, जागा वाटपासंदर्भात भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याचे शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) भाजप सोडणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्पल पर्रिकर आम आदमी पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

गोव्यात आम आदमी पक्ष (AAP) जोरदारपणे मैदानात उतरला आहे. अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यासाठी आपले व्हिजन मांडले. आताच्या घडीला केजरीवाल यांनी घरोघरी भेटी देऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. गोव्यात येताच केजरीवाल यांनी सांत आंद्रे आणि शिरोडा या मतदारसंघांना भेटी दिल्या. घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. 

दिल्लीप्रमाणे गोव्यातील व्यवस्था बदलणार

गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास दिल्लीप्रमाणे गोव्यातील आरोग्य, शिक्षण व्यवस्था बदलणार आहोत. तसेच वीजही मोफत देणार आहोत. सरकार आल्यास बेरोजगारांना महिना ३ हजार मिळतील. तसेच सरकार झाल्यावर ६ महिन्यात मायनिंग सुरु केली जाईल.  सहा महिन्याच्या आत जमीन हक्क मिळतील. १८ वर्षांवरील महिलांना ७ हजार देणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी यावेळी गोवेकरांना दिले. 

गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवू

गोव्यात केवळ मोफत वीज देणार नाही, तर येथील पर्यटन, येथील गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवू. आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास ५ वर्षांत एका कुटुंबला १० लाखांचा फायदा होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी केला आहे. यावेळी बदल होईल, असा गोवेकरांना विश्वास आहे. गोव्याच्या आजच्या स्थितीला सर्व पक्ष जबाबदार आहेत. आपल्यावर अन्याय होतोय, याचा तरुणांना राग आहे, भ्रष्टाचार केवळ आमची संपवू शकतो, बाकी कुणी नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. 

उत्पल पर्रिकर आम आदमी पक्षात आल्यास स्वागतच

दिल्लीला आम्ही काम केले आहे. आमचा DNA दिल्लीतील काम बघितल्यावर कळतो. आमचा पक्ष केवळ एकमेव प्रामाणिक पक्ष आहे. तोडफोडीचे राजकारण आम्हाला काळत नाही. आम्ही टीएमसीसोबत जाणार नाही.  उत्पल पर्रीकर आपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे. तसेच मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, असे सांगत संजय राऊत यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आधी आपले पाहावे, असा पलटवारही केजरीवाल यांनी केला. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार असून, १० मार्च रोजी मतमोजणी आहे.
 

Web Title: goa election 2022 arvind kejriwal said if utpal parrikar desired we welcomed in aam aadmi party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.