Goa Election 2022: “माझ्याविरोधात कोण आहे याने फरक पडत नाही”; बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:55 AM2022-01-25T09:55:15+5:302022-01-25T09:56:21+5:30
Goa Election 2022: गेल्या २० वर्षांपासून जनतेची सेवा करतोय. विराेधकांंची मला पर्वा नाही, असे बाबूश मोन्सेरात यांंनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : मला विराेधकांंची पर्वा नाही. माझ्याविरोधात कोण निवडणूक लढवत आहे, याचा मला फरक पडत नाही. लोकांंच्या सेवेसाठी मी नेहमीच काम सुरुच ठेवणार आहे’ असे पणजीचे भाजप उमेदवार बाबूश मोन्सेरात यांंनी स्पष्ट केले.
पणजी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात प्रचार करीत आहेत. बॉक द व्हाक परिसराला भेट दिली. माजी आमदार सिद्धार्थ कुंंकळ्येकर यांंच्या घरी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांंनी कुंकळ्येकर यांच्याकडे पाठिंंब्याचे आवाहन केले. मोन्सेरात म्हणाले, ‘गेल्या २० वर्षांपासून मी जनतेची सेवा करीत आहे. त्यामुळे लोक मला निवडणुकीत जिंंकून आणतील, याची आपल्याला खात्री आहे.’
मोन्सेरात म्हणाले, माझ्या विरोधात निवडणुकीत कोण उतरले आहे, माझ्या विरोधात कोण निवडणूक लढवत आहे याचा मला फरक पडत नाही. केवळ निवडणुका जवळ येताच मी माझ्या मतदारांंची भेट घेत नाही तर मी नेहमीच माझ्या मतदारांंच्या संंपर्कात असतो. या काळात त्यांंच्या समस्या मी जाणून घेतो. मी इतकी वर्षे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने मी नक्की कसा आहे हे जनतेला ठाऊक आहे.’ जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांंच्यासोबत पणजी महानगरपालिकेच्या नगरसेवक दीक्षा माईणकर तसेच भाजपचे कार्यकर्ते हजर होते.