Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ‘रोड शो’ला मोठा प्रतिसाद; चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 05:10 PM2022-02-07T17:10:03+5:302022-02-07T17:10:48+5:30

Goa Election 2022: राहुल गांधी गोव्यात आल्याचा एक टक्काही परिणाम भाजपवर होणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

goa election 2022 big response to cm pramod sawant roadshow special presence of chitra wagh | Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ‘रोड शो’ला मोठा प्रतिसाद; चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती

Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ‘रोड शो’ला मोठा प्रतिसाद; चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डिचोली : साखळी मतदारसंघात तसेच राज्यात  विकासाच्या अनेक योजना पूर्ण केल्या आहेत. आगामी पाच वर्षात राज्यात समृद्धीसाठी नव्या  योजनांची तयारी केली आहे. साखळी शहरात अनेक लोक भाजप प्रवेश करीत असल्याने या वेळेला मतदारसंघात भाजपला विक्रमी मतदान होणार असल्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. राहुल गांधी साखळीत आले म्हणून त्याचा एक टक्काही परिणाम भाजपवर होणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

राहुल गांधी येऊन  काँग्रेसला मते मिळणार नाहीत.भाजपवर कोणताही परिणाम नसून जनतेने डबल इंजिन सरकारची निवड केलेली आहे. ती १४ रोजी परिपूर्ण होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. देसाईनगर येथून रोड शोला सुरुवात झाली. संपूर्ण कॉलनी तसेच बाजारात फिरून पत्रके वितरण करण्यात आली. यावेळी सिद्धिविनायक देवस्थानच्या संपूर्ण समितीने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे डॉ. सावंत यांनी स्वागत केले. यावेळी भाजपच्या उपाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी गोवा आदर्श राज्य असून, डॉ. सावंत यांनी प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रशासन दिले.   

यावेळी  शुभदा सावईकर, आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रह्मा देसाई, मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, रश्मी देसाई, दयानंद बोर्येकर,  यशवंत देसाई  यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.
 

Web Title: goa election 2022 big response to cm pramod sawant roadshow special presence of chitra wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.