Goa Election 2022: भाजपची पहिली यादी आज; बाबूश मोन्सेरात यांची पाच तिकिटांची मागणी पूर्ण! अनेक नेत्यांना नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:54 AM2022-01-19T09:54:30+5:302022-01-19T09:55:50+5:30
Goa Election 2022: दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत गोव्यातील पहिल्या उमेदवार यादीला अंतिम मंजुरी दिली जाईल, असे सांगितले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : भाजपतर्फे काणकोणमध्ये रमेश तवडकर, सावर्डेत गणेश गावकर, सांताक्रुझमध्ये आग्नेल डिकुन्हा, सांगेत सुभाष फळदेसाई यांना तिकीट दिले जाणार आहे. आज दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल व त्यावेळी अंतिम मंजुरी दिली जाईल.
कुंभारजुवे मतदारसंघात जेनिता मडकईकर यांना तिकीट दिले जाईल. मांद्रेत दयानंद सोपटे यांना तिकीट निश्चित झाले आहे. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस तसेच काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांना भाजपने तिकीट नाकारले आहे. सांगेत सावित्री कवळेकर यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री दिपक पाऊसकर यांनाही तिकीट नाकारले गेले आहे.
बाबूशला पाच तिकिटे
बाबूश मोन्सेरात यांनी तिसवाडी तालुक्यात एकूण पाच तिकिटे पक्षाकडे मागितली होती. ती पाचही तिकिटे दिली गेली. सांताक्रुझमध्ये आग्नेलला, सांत आंद्रेत फ्रान्सिस सिल्वेरा तर कुंभारजुवेत जेनिता मडकईकरला तिकीट द्यावे हा बाबूशचाच आग्रह होता. अन्य भाजप मंत्र्यांना याचे आश्चर्य वाटते आहे.