Goa Election 2022: लक्ष्मीकांत पार्सेकरांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालूच, आम्हाला यश मिळेल; मुख्यमंत्र्यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 09:16 AM2022-01-26T09:16:45+5:302022-01-26T09:18:10+5:30
Goa Election 2022: नाराज असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे मन वळवण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न चालूच ठेवले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी: मांद्रे मतदारसंघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे मन वळवण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न चालूच ठेवले आहेत. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती देताना सांगितले की, ''पार्सेकर यांच्याशी आमची बोलणी अजून चालूच आहेत. त्यांनी निर्णय बदलावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि यात आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे.''
दरम्यान, सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे गोमंतकीय जनतेच्यावतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले आहे. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या कामाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे त्यांचे कार्य आदर्शवत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ब्रह्मानंद शंखवाळकर यांनीही गोव्याचे नाव बुलंद केले. फुटबॉल आणि शंखवाळकर असे समीकरण रूढ होते. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून त्यांचेही अभिनंदन, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.