Goa Election 2022: फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी! भाजप नेत्याचे बंड शमले; प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 09:06 AM2022-01-24T09:06:40+5:302022-01-24T09:07:16+5:30

Goa Election 2022: भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत या नेत्याला उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले.

goa election 2022 devendra fadnavis mediation successful bjp leader revolt subsided appointment as party state vice president | Goa Election 2022: फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी! भाजप नेत्याचे बंड शमले; प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Goa Election 2022: फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी! भाजप नेत्याचे बंड शमले; प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : साळगावची उमेदवारी जयेश साळगावकर यांना दिल्याने नाराज झालेल्या दिलीप परुळेकर यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी   नियुक्ती  करून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे साळगावचे उमेदवार जयेश साळगावकर यांचा निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत परुळेकर यांना उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले.

तानावडे म्हणाले की, नाराज बनल्यानंतर  परुळेकर यांनी भाजप सोडला नाही. पक्षासोबतच ते राहिले. निवडणुकीत तिकीट मिळणेच सर्व काही नाही. ते अनेक वर्षे पक्षासोबत होते व त्यांनी पक्षाचे काम केले. प्रामाणिकपणे जो पक्षाचे काम करतो त्याचा पक्ष नेहमीच सन्मान करतो. पक्षासाठी ते नेहमीच काम करीत राहतील. निवडणुकीत मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परुळेकर म्हणाले की, भाजप पक्षाने आपल्याला उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, यासाठी त्यांचे आभार. पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी दिली ती निश्चितच आपण प्रामाणिकपणे पार पाडू.  मध्यंतरी  आपण नाराज झालो असलो तरी अन्य पक्षांत जाण्याचा विचार आपण कधीही मनात आणला नाही. निवडणुकीत भाजपसाठी साळगाव मतदारसंघात काम करू. कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: goa election 2022 devendra fadnavis mediation successful bjp leader revolt subsided appointment as party state vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.