Goa Election 2022: गोव्यात बहुरंगी लढती; अपक्षांची भाऊगर्दी, एकाच तालुक्यात ५६ तर १ जागेसाठी सर्वाधिक १३ जण रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:54 PM2022-02-01T14:54:57+5:302022-02-01T14:55:30+5:30
Goa Election 2022: सर्वांत जास्त १३ उमेदवार रिंगणात राहिले असून यातील ५ उमेदवार हे विविध पक्षातील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हापसा : विधानसभा निवडणुकीसाठी बार्देश तालुक्यातील सात मतदारसंघातून ५२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या काल शेवटच्या दिवशी पाच जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. शिवोलीतून सर्वात जास्त १३ उमेदवार रिंगणात राहिले असून यातील पाच उमेदवार हे विविध पक्षातील आहेत.
बार्देशातील बहुतांश मतदारसंघात भाजपा-काँग्रेस-तृणमूल तसेच आप असा चौरंगी राजकीय सामना रंगणार आहे. काही मतदारसंघात प्रबळ असे अपक्ष व आरजीचे उमेदवार रिंगणात आहेत. म्हापशातून जोशुआ डिसोझा (भाजप), सुधीर कांदोळकर (काँग्रेस), तारक आरोलकर (तृणमूल), राहुल म्हांबरे (आप), रोहन साळगावकर (आरजी), जितेश कामत (शिवसेना) तसेच दोन अपक्ष रिंगणात आहेत.
शिवोलीतून दयानंद मांद्रेकर (भाजपा), डिलायला लोबो (काँग्रेस), लिओ डायस (तृणमूल), करिश्मा फर्नांडिस (शिवसेना), डायना फर्नांडिस (सभाजी ब्रिगेड पक्ष), गौरेश मांद्रेकर (आरजी), जगनाथ गावकर (जय महाभारत पक्ष), विष्णू नाईक (आप), अनिल केरकर (अपक्ष), दत्ताराम पेडणेकर (अपक्ष), पल्लवी दाभोलकर (अपक्ष), विनोद पालयेकर (अपक्ष) व सावियो आल्मेदा (अपक्ष) यांचा त्यात समावेश होतो.
हळदोणातून ग्लेन टिकलो (भाजप), किरण कांदोळकर (तृणमूल), महेश साटेलकर (आप), गोविंद गोवेकर (शिवसेना), ॲड. कार्लुस फरेरा (काँग्रेस) व पूजा मयेकर (अपक्ष). पर्वरीतून रोहन खंवटे (भाजप), संदीप वझरकर (तृणमूल), रितेश चोडणकर (आप), विकास प्रभूदेसाई (काँग्रेस) व शंकर फडते (राष्ट्रवादी काँग्रेस).
साळगावमधून जयेश साळगावकर (भाजप), भोलानाथ घाडी (तृणमूल), रोहन कळंगुटकर (आरजी), केदार नाईक (काँग्रेस) व मारियो कुद्रेरो (आप), रुपेश नाईक (अपक्ष) हे आहेत. कळंगुटमधून मायकल लोबो (काँग्रेस), रिकार्डो डिसोझा (अपक्ष), जोसेफ सिक्वेरा (भाजप), मार्सेनिनो गोन्साल्वीस (आरजी), रोशन माथायिस (गोंयचो स्वाभीमान पक्ष), अँथनी मिनेझिस (तृणमूल), सुदेश मयेकर (आप). थिवीतून नीळकंठ हळर्णकर (भाजप), कविता कांदोळकर (तृणमूल), अमन लोटलीकर (काँग्रेस), तुकाराम परब (आरजी), स्वप्नेश शेर्लेकर (गोंयचो स्वाभीमान पक्ष), गॉडफ्रे डिलिमा (राष्ट्रवादी काँग्रेस), उदय साळकर (आप) हे निवडणूक रिंगणात आहेत.