Goa Election 2022: निवडून आल्यावर वर्षभरात ‘ते’ प्रश्न सुटतील; आम आदमी पक्षाची गोवेकरांना ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 09:54 AM2022-01-26T09:54:22+5:302022-01-26T09:55:22+5:30
Goa Election 2022: मडगाव आणि फातोर्डा रहिवाशांना कचरा समस्येचा सामना करावा लागत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
फातोर्डा : आम आदमी पार्टीचे फातोर्डा येथील उमेदवार संदेश तळेकर देसाई यांनी पक्षाची सत्ता आल्यास एक वर्षात सोंसडोचा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही फातोर्डातील जनतेला दिली आहे. ‘राज्य सरकार दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सोनसोडो वारसा कचरा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे, त्यामुळे मडगाव आणि फातोर्डा रहिवाशांना कचरा समस्येचा सामना करावा लागत आहे’ असे देसाई म्हणाले.
मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले, ‘कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यासोबतच या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या आणि कचरा व्यवस्थापन हाताळण्यासाठी तयार असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडे उपलब्ध आहे. मात्र, काही स्वार्थी हेतूंमुळे सरकारने कचरा व्यवस्थापनाच्या समस्या सोडवल्या जात नाही. 'आप' सरकार आल्यास वर्षभरात सोनसोडांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल.’ ‘फातोर्डा येथील लोक इतक्या वर्षांनंतर आशेने 'आप'कडे पाहत आहेत’ असे त्यांनी सरतेशेवटी सांगितले.