Goa Election 2022: जनतेच्या मनात पुन्हा भाजपच; राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार येईल : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 06:19 PM2022-01-27T18:19:12+5:302022-01-27T18:19:34+5:30
मुख्यमंत्री, सभापतींचे अर्ज दाखल.
राज्यातील भाजप सरकारने डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाआखाली अतिशय प्रभावी कामगिरी केलेली आहे. आगामी निवडणुकीत राज्यात २२ अधिकसह भाजपचे सरकार सत्तेत येईल. डॉ सावंत मुख्यमंत्री, तर राजेश पाटणेकर मंत्री बनतील, असा दावा भाजप गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला. डॉ प्रमोद सावंत तसेंच सभापती राजेश पाटणेकर यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी फडणवीस उपस्थित होते.
केंद्र व राज्य मिळून डबल इंजिन सरकारने प्रत्येक घरात समृद्दीचा नारा देताना अनेक योजना घरात पोचवल्या. अनेक कल्याणकारी योजनांना चालना दिली, राज्याचा चौफेर विकास साधला. त्यामुळे जनतेच्या मनात पुन्हा भाजपच आहे. आमचे २२ हून अधिक आमदार निवडून येतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्या हस्ते भाजप प्रचार कार्यलय याचे उदघाटन करण्यात आले
भाजपला साथ
"राज्यातील जनतेने भाजपला साथ द्यायचे निश्चित केलेले आहे अनेक क्षेत्रात आम्ही विकास साधला त्यामुळे डबल इंजिन सरकारच विकासाला चालना देऊ शकते यांची जनतेला खात्री पटलेली आहे," असे डॉ सावंत म्हणाले. राजेश पाटणेकर यांनी जनता भाजपला पुन्हा संधी देण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले.