Goa Election 2022: “पणजीकरांचा मलाच पाठिंबा, गोव्यात माझ्या बाजूने मूक लाट”; उत्पल पर्रिकरांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:36 PM2022-02-11T16:36:17+5:302022-02-11T16:37:26+5:30

Goa Election 2022: उत्पल पर्रिकरांना मिळत असलेला पाठिंबा दिवसेंदिवस भाजपचे टेन्शन वाढवत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

goa election 2022 utpal parrikar said not only people from panjim but also all govekar supported me | Goa Election 2022: “पणजीकरांचा मलाच पाठिंबा, गोव्यात माझ्या बाजूने मूक लाट”; उत्पल पर्रिकरांना विश्वास

Goa Election 2022: “पणजीकरांचा मलाच पाठिंबा, गोव्यात माझ्या बाजूने मूक लाट”; उत्पल पर्रिकरांना विश्वास

Next

पणजी: गोवा विधासभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर हळूहळू प्रचारतोफा शमताना दिसत असून, घरोघरी जाऊन भेटी देण्यावर उमेदवारांचा भर दिसत आहे. गोव्याच्या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष पणजी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांच्या लढतीकडे लागले आहे. उत्पल पर्रिकरांना केवळ पणजीतून नाही, तर संपूर्ण गोव्यातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. उत्पल पर्रिकर यांनी स्वतः ही बाब मान्य केली आहे. 

राज्यात आपल्या बाजूने एक मूक लाट आहे. सन २०१९ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर आपण तिकीट मागितले होते. परंतु, स्थानिक राजकारणामुळे भाजपने तिकीट नाकारले, असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मला माझ्या लोकांचा पाठिंबा मिळत आहे. तो आणखी वाढेल, असा विश्वास उत्पल पर्रिकर यांनी व्यक्त केला. 

पणजीकरांचा मलाच पाठिंबा

२०१९ मध्ये स्थानिक राजकारणामुळे मला तिकीट नाकारण्यात आले, तेव्हा मी पक्षाच्या निर्णयाचे पालन केले. परंतु यानंतर काँग्रेसमधून एका व्यक्तीला आणण्यात आले आणि त्याला उमेदवारी देण्यात आली. त्या व्यक्तीवर इतके घृणास्पद आरोप होते की, मला याबद्दल बोलण्याची देखील लाज वाटते. एवढ्या कष्टाने माझ्या वडिलांनी सांभाळलेला हा मतदारसंघ त्यांच्या हातात जावा. आम्ही शरणागती पत्करावी हे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत मी शांतपणे कसा बसू शकतो? त्यामुळे जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले, असे उत्पल पर्रिकर यांनी सांगितले. 

उमेदवारीही मागे घेतली असती, पण...

लढाई कधीही पर्यायांसाठी नव्हती. मी म्हटले होते की, चांगला उमेदवार द्या आणि मी स्पर्धा सोडेन, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मला माझ्या लोकांचा पाठिंबा मिळेल, तो वाढेल, असा विश्वास असल्याचे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी पणजी मतदारसंघात पहिल्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांची काही दिवसांपूर्वी उत्पल पर्रिकर यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. वेलिंगकर यांचे पुत्र शैलेंद्र यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरला होता. तो मागे घेत त्यांनी याआधीच उत्पल यांना पाठिंबा दिलेला आहे. उत्पल पर्रिकर यांनी काँग्रेस व आप वगळता भाजपविरोधी प्रत्येक घटकाकडून पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. उत्पल यांना मिळत असलेले वाढते समर्थन लक्षात घेता भाजपचे टेन्शन दिवसेंदिवस वाढत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
 

Web Title: goa election 2022 utpal parrikar said not only people from panjim but also all govekar supported me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.