Goa Election Result 2022: गोव्यामध्ये 'काँटे की टक्कर', सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:58 AM2022-03-10T08:58:14+5:302022-03-10T08:58:26+5:30
Goa Election Result 2022: गोव्यातील विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात भाजपाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे.
Goa Election Result 2022: गोव्यातील विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात भाजपाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. गोव्यात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली असून २० जागांवर आघाडी प्राप्त केली आहे. तर भाजप १५ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्ष ४ जागांवर आघाडीवर असून सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये 'काँटे की टक्कर' असून भाजपाची सत्ता आता पणाला लागली आहे. काँग्रेसला सध्या मिळालेली आघाडी पाहता भाजपला गोव्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात काँग्रेसनं निकाल लागण्याआधीच राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. गोव्यात काँग्रेसनं फोडाफोडीला आळा घालण्यासाठी आपल्या उमेदवारांना एका हॉटेलात ठेवल्याचीही माहिती समोर आली आहे.
गोव्यात २०१७ सालचं विधानसभा निवडणूक पक्षीय बलाबल-
एकूण जागा: ४०
बहुमत: २१
काँग्रेस: १७
भाजप: १३
अपक्ष: ३
महाराष्ट्रवादी गोमंतक: ३
गोवा फॉरवर्ड पार्टी: ३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: १