Goa Election Result 2022: गोव्यात चक्क भाजप वि. भाजप सामना! प्रमोद सावंतांना नेता मानण्यास नकार; आमदाराने थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 02:35 PM2022-03-14T14:35:04+5:302022-03-14T14:36:45+5:30

Goa Election Result 2022: भाजपचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांना पक्षातून विरोध होताना दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

goa election result 2022 goa cold war between bjp pramod sawant and vishwajit rane for chief minister post of goa | Goa Election Result 2022: गोव्यात चक्क भाजप वि. भाजप सामना! प्रमोद सावंतांना नेता मानण्यास नकार; आमदाराने थोपटले दंड

Goa Election Result 2022: गोव्यात चक्क भाजप वि. भाजप सामना! प्रमोद सावंतांना नेता मानण्यास नकार; आमदाराने थोपटले दंड

Next

पणजी: गोवा विधासभा निवडणुकांचा निकाल (Goa Election Result 2022) भाजपच्या बाजूने लागला. भाजपने गोव्यात निर्भेळ यश मिळवत २० जागा जिंकल्या. भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले असून, अन्य अपक्ष उमेदवारांनीही पक्षाला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. लवकरच डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असले, तरी भाजपमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र नाही. कारण एका भाजप नेत्यांना प्रमोद सावंत यांना आपला नेता मानण्यास नकार दिला असून, त्यांच्याविरोधात दंड थोपटल्याचे पाहायला मिळत आहे. 

गोव्यातील भाजपच्या विजयाबाबत विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांचे मोठे कौतुक झाले. मात्र, आता मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांना पक्षातून विरोध होताना दिसत आहे. नवनिर्वाचित आमदार विश्वजित राणे यांनी थेट मुख्यमंत्री सावंत यांच्याविरोधात पुन्हा दंड थोपटले आहेत. चक्क उघड-उघड आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केले असून, इतक्या दिवस भाजप विरुद्ध विरोधक असा रंगलेला सामना चक्क भाजप विरुद्ध भाजप असा रंगताना दिसत आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र गायब

गोव्यातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना नेता मानण्यास नकार दिला असल्याचे सांगितले जात आहे. विश्वजित राणे कुटुंबीयांनी स्थानिक वृत्तपत्रात सलग दुसऱ्या दिवशी दिलेल्या जाहिरातीत डॉ प्रमोद सावंत यांना स्थान दिलेले नाही. त्यामुळे एकच चर्चा रंगलीय. वाळपाई विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे धन्यवाद मानण्यासाठी विश्वजित राणे यांनी स्थानिक आघाडीच्या वृत्तपत्रांत पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी. टी. रवी आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची छायाचित्रे आहेत. मात्र, यातून फक्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र गायब आहे. विशेष म्हणजे विश्वजित राणे यांची पत्नी डॉ. दिव्या राणे यांनी यापूर्वी दिलेल्या जाहिरातीतही डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र गायब होते. त्यामुळे प्रमोद सावंत यांच्यावरील नाराजी उघड होत असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या गेल्या त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असे बोलले जात आहे. परंतु पक्षाच्या नेतृत्वाने अद्याप कुठलेही संकेत दिले नाहीत. मात्र त्याआधीच विश्वजित राणे अचानक राज्यपालांच्या भेटीला पोहचले. राज्यपालांना कुणीही भेटू शकते असे ते म्हणाले असले तरी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली. विश्वजित राणे हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तर नाही ना? असे विचारले जात आहे. भाजपमधील अंतर्गत कलह असल्याचेही संकेत मिळत आहेत. कारण सरकार बनवण्यासाठी एमजीपीने दिलेले समर्थन काहींना आवडले नाही. एमजीपीने गोवा निवडणुकीत टीएमसीच्या ममता बॅनर्जींसोबत आघाडी केली होती. त्यामुळे पक्षातील काही नेते नाराज आहेत. परंतु हायकमांडच्या निर्णयापुढे कुणीही काही बोलण्यास तयार नाही.  
 

Web Title: goa election result 2022 goa cold war between bjp pramod sawant and vishwajit rane for chief minister post of goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.