Goa Election 2022: “गोव्यात काय होईल सांगता येत नाही, इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:22 PM2022-01-19T17:22:17+5:302022-01-19T17:23:13+5:30

Goa Election 2022: गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवत असून, आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

goa elections 2022 sanjay raut said only our party will come to power we will show power of shiv sena ncp alliance | Goa Election 2022: “गोव्यात काय होईल सांगता येत नाही, इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे”: संजय राऊत

Goa Election 2022: “गोव्यात काय होईल सांगता येत नाही, इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे”: संजय राऊत

Next

पणजी: गोव्यात विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती करणार असल्याचे शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी संयुक्त पत्रकार परीषदेत जाहीर केले. यांनतर प्रतिक्रिया देताना गोव्यात काय होईल हे सांगता येणार नाही, इतके घाणेरडे राजकारण सध्या सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

शिवसेना आणि राष्ट्रवादीने गोव्यात एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. जेवढ्या जागांवर आम्ही उभे राहू तेवढ्या जिंकू. गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आया राम गया राम ही कल्पना आता हरियाणानंतर गोव्यात दिसत आहे. गोव्यात काय होईल हे सांगता येत नाही इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाचा आणि गोव्यातील राजकीय पक्षांचा लोकांना कंटाळा आला आहे. महाराष्ट्रातले सरकार पाहून येथील लोक आम्हाला संधी देऊन पाहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

गोव्यात निवडणुकीच्या आधी एकत्र येण्याचा प्रयत्न केला

प्रफुल्ल पटेल यांनी काय झाले आणि आम्हाला काय करायचे होते हे सांगितले आहे. पण काँग्रेसची काही अडचण होती. आम्ही गोव्यात निवडणुकीच्या आधी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला वाटत आहे की ते त्यांच्या ताकदीवर सरकार बनवू शकतात म्हणून त्यांना आमच्याकडून शुभेच्छा देतो, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच काँग्रेसच्या चिन्हावर निवडणून आलेल्या आमदारांवर काँग्रेसलाच खात्री नव्हती. ते एका रात्रीत सोडून गेले. वेगवेगळे लढल्याने फायदा होईल, अशी काही लोकांच्या मनात भीती आहे. पण लोक शहाणपणाने मतदान करतील याची आम्हाला खात्री आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

उत्पल पर्रिकरांचा विषय भाजपाचा अंतर्गत विषय

उत्पल पर्रिकरांचा विषय भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे. मनोहर पर्रिकर गोव्याचे महत्त्वाचे नेते होते. त्यामुळे लोकांची भावना आहे की, त्यांच्या मुलाला तिकीट मिळावे. दादरा नगर हवेलीची निवडणूकीत तीनवेळा पराभव झाल्यानंतर आम्ही चौथ्यांदा जिंकलो. गोव्यात आम्ही युतीच्या माध्यमातून लढलो. त्यावेळी आमच्या वाट्याला दुर्दैवाने अशा जागा आल्या जिथे शिवसेनेचे काम नव्हते. यावेळी आम्ही दहापेक्षा जास्त जागांवर लढत आहोत. आम्ही दोघे एकत्र आहोत त्यातून नक्कीच आम्हाला यश मिळेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आम्ही काँग्रेसला गोव्याची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याची ऑफर दिली होती, पण ती व्यर्थ ठरली. त्यांनी ना हो म्हटले ना नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रपणे गोव्याची निवडणूक लढवतील, सर्व ४० जागा नव्हे, तर मोठ्या संख्येने. लवकरच पहिली यादी जाहीर होऊ शकते आणि त्यानंतर इतर याद्या जाहीर होऊ शकतात, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. 
 

Web Title: goa elections 2022 sanjay raut said only our party will come to power we will show power of shiv sena ncp alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.