ओल्ड गोवा राखून ठेवण्यासाठी गोवा फॉरवर्डचे युनेस्कोला साकडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 07:35 PM2020-11-29T19:35:48+5:302020-11-29T19:38:31+5:30

Old Goa : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी युनेस्कोचे अध्यक्ष मॅचटिल्ड रॉसलर व आयकोमोसचे उपाध्यक्ष रोहित जिग्यासू याना पत्र लिहून गोवा सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी दोन्ही आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

Goa Forward joins UNESCO to preserve Old Goa! | ओल्ड गोवा राखून ठेवण्यासाठी गोवा फॉरवर्डचे युनेस्कोला साकडे!

ओल्ड गोवा राखून ठेवण्यासाठी गोवा फॉरवर्डचे युनेस्कोला साकडे!

Next

मडगाव: जागतिक वारसा स्थळे असलेला एला गाव पीडीएच्या क्षेत्रात न आणता ही स्थळे राखून ठेवावी यासाठी गोवा फॉरवर्डने  युनेस्को आणि आयकोमोस या संघटनांना साकडे घातले आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी युनेस्कोचे अध्यक्ष मॅचटिल्ड रॉसलर व आयकोमोसचे उपाध्यक्ष रोहित जिग्यासू याना पत्र लिहून गोवा सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी दोन्ही आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

बॉ जिजस बासिलिका, सेंट फ्रान्सिस्क ऑफ आसीसी चर्च, सेंट केजीटन चर्च आणि सेंट आगुस्टीन चर्च या सारख्या वारसा महत्त्वाचे चर्च असल्याने हा परिसर युनेस्को वारसा परिसर जाहीर करण्यात आला आहे. या चर्चेस असलेला एला हा गाव गोवा सरकारने ग्रेटर पणजी पीडीएच्या कक्षेत आणण्याचे ठरविले आहे. जर एला गाव पीडीएच्या कक्षेत आल्यास या जागतिक वारसा स्थळांच्या अवघ्या 100 मीटर अंतरात टोलेजंग इमारती उभ्या होतील याकडे सरदेसाई यांनी युनेस्कोचे लक्ष वेधले आहे.

यापूर्वी सरदेसाई यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करत हा निर्णय मागे घेतल्याची घोषणा 3 डिसेंबर पर्यंत मागे घ्यावी अशी मागणी केली होती. यासंबंधी गोवा सरकारने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. याबद्दल बोलताना सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. पण आम्ही सरकारचे हे कारस्थान प्रत्यक्षात येऊ देणार नाहीत असा इशारा सरदेसाई यांनी दिला आहे.
 

Web Title: Goa Forward joins UNESCO to preserve Old Goa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा