स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग कुंकळ्येकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 02:01 PM2023-08-06T14:01:31+5:302023-08-06T14:03:05+5:30
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा :गोवामुक्ती लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले पांडुरंग रामचंद्र शेणवी - कुंकळ्येकर (वय २१) यांचे शनिवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल स्वातंत्र्यसैनिक संघटनांसह फडावासीयांनी दुःख व्यक्त केले आहे.
पांडुरंग कुंकळ्येकर हे मूळ म्हार्दोळ-कुंकळ्ळी येथील, मात्र ते शांतीनगर-फोंडा येथे वास्तव्य होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्यसैनिक संघटना गोवाचे ते माजी अध्यक्ष होते. गोवा पोर्तुगिजांपासून मुक्त करण्यासाठी कुंकळ्येकर यांनी मोलाचा वाटा दिला. गोव्यात तिसरीपर्यंत शिक्षण घेऊन नंतर ते पुढील शिक्षणासाठी ते मुंबई, पुणे येथे गेले. त्यानंतर पोर्तुगिजांविरोधात लढ्यात ते उतरले. गोवामुक्त झाल्यानंतर त्यांनी भाऊसाहेब बांदोडकर व अन्य काही विचारवंतांच्या सहकार्याने महाराष्ट्र गोमंतक पक्षाची स्थापना केली. फोंड्यातील सदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते संस्थापक होते. याचबरोबर गोवा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव म्हणूनही त्यांने काम केले आहे. अनेक सामाजिक संस्था तसेच क्लबनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मान केला आहे.
दरम्यान, त्यांच्या पश्चात कन्या, जावई तसेच तीन नाती असा परिवार आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक व अन्य क्षेत्रांतील लोकांनी उपस्थित राहून अंत्यदर्शन घेतले.