Goa: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाबाबत जीसीसीआयचे केंद्र सरकारला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 01:37 PM2024-03-03T13:37:26+5:302024-03-03T13:39:05+5:30
Goa News: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमानांची उड्डाणे कमी केल्याबद्दल उद्योजकांनी चिंता व्यक्त आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विमानतळाच्या अस्तित्वाबाबत पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली आहे.
- नारायण गावस
पणजी - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमानांची उड्डाणे कमी केल्याबद्दल उद्योजकांनी चिंता व्यक्त आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विमानतळाच्या अस्तित्वाबाबत पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली आहे.
जीसीसीआयने नमूद केलेल्या निवेदनानुसार दाबोळी विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अंदाजे १५ ते २० टक्के कमी आहे. मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कंपन्यांनी विमाने स्थलांतरित केल्याने ही घट जाणवली आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळावर अवलंबून असलेल्या भागधारक आणि व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे. दाबोळीचे बंद विमानतळामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटन उपक्रमांवर विपरित परिणाम होईल, असे जीसीसीआयने म्हटले आहे.
जीसीसीआयने म्हटले आहे की या बाबतीत आम्ही केंद्र सरकारला कळवले आहे. दाबोळी येथील विमानतळ देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेवा देतो आणि हा महत्वाचा असा विमानतळ आहे. या विमानतळामुळे राज्याच्या आर्थिक विकासात भर पडली आहे. ही प्रमुख एअरलाइन ऑपरेशन्स बंद केल्याने इतर कंपन्यांची विमान सेवा बंद होतील आणि अखेरीस हा विमानतळ पूर्ण बंद होऊ शकतो अशी भिती जीसीसीअयाने वर्तविली आहे.
जीसीसीआयने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी संबंधित भागधारकांसोबत बैठक करण्याची विनंती केली आहे. ही बैठक घेऊन त्यांच्या सुचना लक्षात घेण्याची मागणी केली आहे. या अगाेदर कॉँग्रेस गोवा फॉरवर्ड तसेच इतर राजकीय पक्षांनी याची भिती व्यक्त केली आहे.