Goa: दाबोळी विमानतळ ताब्यात घेण्यासाठी जीएमआरचा नौदलावर दबाव, आमदार रेजिनाल्ड यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 12:15 PM2024-02-05T12:15:44+5:302024-02-05T12:31:48+5:30

Goa News: मोपा विमानतळ ताब्यात घेऊन तेथून होणारी विमान वाहतूक मोपा विमानतळावरून वळविण्यासाठी जीएमआर कंपनी नौदलावर दबाव टाकत असल्याचा दावा आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोमवारी विधानसभेत केला. यावर मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी स्पष्टीकरण मागितले. 

Goa: GMR pressure on Navy to take over Daboli airport, MLA Reginald claims | Goa: दाबोळी विमानतळ ताब्यात घेण्यासाठी जीएमआरचा नौदलावर दबाव, आमदार रेजिनाल्ड यांचा दावा

Goa: दाबोळी विमानतळ ताब्यात घेण्यासाठी जीएमआरचा नौदलावर दबाव, आमदार रेजिनाल्ड यांचा दावा

- वासुदेव पागी
पणजी - मोपा विमानतळ ताब्यात घेऊन तेथून होणारी विमान वाहतूक मोपा विमानतळावरून वळविण्यासाठी जीएमआर कंपनी नौदलावर दबाव टाकत असल्याचा दावा आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोमवारी विधानसभेत केला. यावर मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी स्पष्टीकरण मागितले. 

दाबोळी विमानतळ पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी आणि तेथील विमान वाहतूक ही मोपावरून वळविण्यासाठी नौदलावर जीएमआर दबाव आणू  पाहत असल्याचा दावाही रेजिनाल्ड यांनी केला. मात्र हा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावताना नौदलावर एक खाजगी कंपनी कशी काय दबाव आणू शकते असा प्रश्न केला. दाबोळी विमानतळ हा सार्वजनिक उपयोगासाठीच ठेवला जाणार आहे. तसे आश्वासन केंद्र सरकारनेही दिले आहे. गोव्यातील सर्व सरकारांनी दिले आहे. तसेच आपले नौदल हे कुणाच्याच दबावाखाली काम करीत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मोपामुळे दाबोळीतील विमान उडाणांवर काहीही फरक पडलेला नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला.  केवळ दाबोळीत होणारी अतिरिक्त वाहतूक मोपा विमानतळाकडे वळविण्याचं आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मोपा विमानळावर नियंत्रण करणाऱ्या जीजीआयएल कंपनीविषयी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की  जीजीआयएल कंपनीबरोबर सरकारचा करार असून त्यानुसार ३६.९ टक्के महसूल हा राज्य सरकारला मिळाला पाहिजे.

Web Title: Goa: GMR pressure on Navy to take over Daboli airport, MLA Reginald claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.