Goa: गोदाम आणि लॉजिस्टिक्स धोरणामुळे गोवा भविष्यात व्यावसायिक केंद्र होईल
By समीर नाईक | Published: March 3, 2024 03:28 PM2024-03-03T15:28:24+5:302024-03-03T15:28:30+5:30
Goa News: सरकारतर्फे व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम आयोजित केले जाते. गोदाम आणि लॉजिस्टिक्स धोरण लागू केल्यामुळे, पुढील दशकात गोव्याला एक प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून स्थान देण्याचे आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.
- समीर नाईक
पणजी - सरकारतर्फे व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम आयोजित केले जाते. गोदाम आणि लॉजिस्टिक्स धोरण लागू केल्यामुळे, पुढील दशकात गोव्याला एक प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून स्थान देण्याचे आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.
व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनने नुकतेच पणजीत आयोजित केलेल्या अमेझिंग गोवा जागतिक एक्स्पो आणि परिषद आणि जागतिक टेक परिषद गोवाचे प्रक्षेपण सोहळ्यादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून माविन गुदिन्हो उपस्थित होते. त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे, माजी केंद्रीय मंत्री, तथा जागतिक एक्स्पो आणि परिषद २०२४, सल्लागार मंडळ अध्यक्ष, सुरेश प्रभू, व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनचे संस्थापक नितीन कुंकळ्ळयेकर, व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनचे अध्यक्ष, राजकुमार कामत आणि अरमान बखले यांची उपस्थिती होती.
व्हायब्रंट गोव्याने प्रदान केलेल्या व्यासपीठाद्वारे सुरू असलेले उपक्रम, जागतिक व्यापाराची व्यवहार्यता प्रदर्शित करण्यासाठी आमची बांधिलकी दर्शविते. हा परिवर्तनवादी दृष्टीकोन आर्थिक कौशल्य वाढवण्याच्या आणि गोव्याला जागतिक बाजारपेठेत प्रस्थापित करण्याच्या आमच्या ध्येयाशी समरस आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले.
जागतिक टेक परिषद २०२४ ही व्यवसायांसाठी तंत्रज्ञानाचे भविष्य समजून घेण्याची आणि त्यांच्या विकासासाठी वापर करण्यास तयार होण्याची एक उत्तम संधी आहे. हा कार्यक्रम चोखपणे, बांधिलकी, समर्पण आणि दूरदृष्टीने आयोजित करण्यात आला आहे, ज्यामुळे तो गोव्यात आयोजित केलेल्या सर्वात अनुकरणीय कार्यक्रमांपैकी एक आहे, असे सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितले.
आम्ही राज्याची कल्पना केवळ पर्यटन स्थळ म्हणून नाही, तर व्यावसायिकांसाठी योग्य केंद्र म्हणूनही करतो. धोरणात्मक प्रगती आणि पुढे विचार करण्याच्या धोरणांद्वारे, आम्ही गोव्याला डिजिटल कर्मचाऱ्यांसाठी एक अग्रगण्य गंतव्यस्थान म्हणून स्थान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक वाढीस आणि जागतिक ओळखीत योगदान मिळेल, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी यावेळी सांगितले.