गोवा सरकार उद्योगपतींचे - केजरीवालांचा हल्लाबोल
By admin | Published: June 28, 2016 11:01 PM2016-06-28T23:01:30+5:302016-06-28T23:01:30+5:30
गोवा सरकार समुद्रकिनारी असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या हिताविरोधात असल्यानेच गोव्यातील मासळी विक्रेते व व्यावसायिक भाजप सरकारला वैतागले आहेत. हे सरकार सर्वसामान्य
वास्को : गोवा सरकार समुद्रकिनारी असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या हिताविरोधात असल्यानेच गोव्यातील मासळी विक्रेते व व्यावसायिक भाजप सरकारला वैतागले आहेत. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे नसून मोठय़ा उद्योगपतींचे आहे, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवा सरकारवर हल्लाबोल केला.
मंगळवारी वास्को येथील दक्षिण-पश्चिम रेल्वे सभागृहात गोव्यातील पारंपरिक मच्छीमार व व्यावसायिकांच्या सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत ह्यगोवा रांपणकार एकवोटह्णचे ओलेन्सियो सिमांस, फादर मयाकल फर्नाडिस, क्रिस्टोडियो डिसोझा, पंढरी केरकर, सुदेश शेट, वसंत नाईक, कारिदाद परेरा, नबार पागी, संजय परेरा, सय्यद कादरी व गोव्याच्या कानाकोप:यातील मासळी व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
केजरीवाल म्हणाले की, येथील भाजप सरकार पारंपरिक मच्छीमार व्यावसायिकांना त्यांचे हक्क देऊ शकत नाही. हे सरकार जनतेला त्यांच्या गरजा कसे पुरवणार? त्यासाठी गोमंतकीयांनी येणा-या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमताने निवडून द्यावे. आमचे सरकार पक्षाचे नसून सर्वसामान्य व गरीब जनतेचे असेल. त्यांच्यामधील एक व्यक्ती गोव्याचा मुख्यमंत्री असेल.
येथील मासळी विक्रेते ही गोव्याची ओळख आहे. सरकार ती पुसून टाकण्याच्या विचारात आहे. हे सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने येथील संस्कृती व पारंपरिक मासळी व्यवसाय नष्ट करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने जागरूक होऊन एमपीटी व केंद्रीय जहाजबांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांना जाबा विचारायला हवा. भाजप व काँग्रेस यांच्यातील साटेलोटय़ामुळे सामान्य माणूस चिरडला जात आहे. ही पिळवणूक संपवायची असेल, तर पुढील विधानसभेत आम आदमी पक्षाला सत्तेवर आणणे हा एकमेव मार्ग आहे.
यावेळी अनेक मच्छीमार संघटनांच्या पदाधिका-यांनी आपल्या समस्या मांडल्या व केजरीवाल यांना निवेदन दिले. यावेळी केजरीवाल यांनी स्व. फादर बिस्मार्क यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
सूत्रसंचालन संदेश तेलेकर यांनी केले. स्व. माथानी साल्ढाणा यांचे भाचे आलेन्सियो सिमांस यांनी, राज्य सरकारने मच्छीमार व्यावसायिकांच्या केलेल्या छळाची व्यथा मांडली. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
यावेळी वास्कोचे आम आदमीचे माजी प्रवक्ते चंद्रशेखर वस्त यांनी सभागृहाबाहेर राहून ह्यआम आदमी पक्ष गरीबांचा नसून श्रीमंतांचा आहे,ह्ण असे लिहिलेले फलक हातात घेऊन निषेध केला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वास्कोचे संयुक्त मामलेदार विनोद दलाल व पोलीस मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
क्रिस्ती नागरिकाच्या घरी भोजन
केजरीवाल यांनी दुपारी खारीवाडा येथे क्रिस्टोडियो डिसोझा यांच्या घरी जेवण घेतले. त्यानंतर ते मिस्किलपणे म्हणाले की, मला आज मासळी नसलेले जेवण मिळाले. कारण मी शुद्ध शाकाहारी आहे व त्यासाठी डिसोझा कुटुंबीयांनी माङयासाठी शाकाहारी जेवण केले होते. मी त्यासाठी त्यांचा आभारी आहे. कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे.