CoronaVirus: ना रेमडेसीवीर, ना लसीकरण सुरु! गोवा सरकार देणार 'या' पाच गोळ्या; परदेशांत ठरल्या प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 01:50 PM2021-05-11T13:50:41+5:302021-05-11T13:55:00+5:30

CoronaVirus Goa Government Decision: आयव्हरमेक्टिन या इतर औषधी गोळ्यांप्रमाणेच दिसणाऱ्या गोळ्या आहेत. त्या विविध ब्रँडमध्येही येतात. दोन प्रकारचे हे डोस आहेत. एक प्रायमरी प्रोफिलेक्सिस तर दुसरा सेकंडरी प्रोफिलेक्सिस, वयोमानानुसार हे डोस दिले जातात. कोरोनाची कोणतीही लक्षणे जरी दिसून आली नसली तरी हे डोस घेणे खबरदारीसाठी चांगले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Goa government to provide ivermectin tablets for 18 above age group people: Vishwajit Rane | CoronaVirus: ना रेमडेसीवीर, ना लसीकरण सुरु! गोवा सरकार देणार 'या' पाच गोळ्या; परदेशांत ठरल्या प्रभावी

CoronaVirus: ना रेमडेसीवीर, ना लसीकरण सुरु! गोवा सरकार देणार 'या' पाच गोळ्या; परदेशांत ठरल्या प्रभावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : कोरोना विरोधी लसीकरण (Corona Vaccination) जरी अद्याप गोव्यात सुरू करता आले नसले तरी अठरा वर्षांवरील व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधे (आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे डोस) लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. यामुळे कोरोना संसर्ग टाळणे अशक्य असले तरी कोरोना संसर्ग धोकादायक प्रमाणात होण्यापासून बचाव होतो, असे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. (All people above 18 years in Goa will be given Ivermectin drug irrespective of their coronavirus status to bring down mortality.)


आयव्हरमेक्टिन (Ivermectin drug on Corona death) या इतर औषधी गोळ्यांप्रमाणेच दिसणाऱ्या गोळ्या आहेत. त्या विविध ब्रँडमध्येही येतात. दोन प्रकारचे हे डोस आहेत. एक प्रायमरी प्रोफिलेक्सिस तर दुसरा सेकंडरी प्रोफिलेक्सिस, वयोमानानुसार हे डोस दिले जातात. कोरोनाची कोणतीही लक्षणे जरी दिसून आली नसली तरी हे डोस घेणे खबरदारीसाठी चांगले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


विश्वजीत राणे म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अठरा वर्षांवरील लोकांसाठी सुरू झालेली लसीकरण मोहीम गोव्यात साठा उपलब्ध नसल्यामुळे अद्याप सुरू करता आलेली नाही. परंतू,  ही प्रतिबंधात्मक औषधे प्रत्येक प्राथमिक केंद्रांवर, तसेच जिल्हा इस्पितळात उपलब्ध असणार आहेत. कोविड बाधा होण्यापूर्वी हे डोस घेणे हितकारक आहे.

कितपत प्रभावी?

पाच दिवसांच्या गोळ्यांचा हा डोस आहे. या गोळ्यांमुळे अनेक संसर्ग टाळता येतात. कोरोना पूर्णपणे टाळता येत नाही. परंतु कोरोना संसर्ग झालाच तर त्याची तीव्रता कमी करणारा हा डोस आहे. ब्रिटन, इटली, स्पेन आणि जपानमध्ये असे प्रयोग प्रभावी दिसून आल्याची माहितीही राणे यांनी दिली. 

Web Title: Goa government to provide ivermectin tablets for 18 above age group people: Vishwajit Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.