गोव्यात शहरीकरण झालेल्या गावांमधील निम्म्या बार, मद्य दुकानांना दिलासा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 01:13 PM2018-03-30T13:13:54+5:302018-03-30T13:13:54+5:30

गोव्यात बारमालक तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानमालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून शहरीकरण झालेल्या गावांमधून जाणाऱ्या महामार्गालगतची सध्या बंद असलेल्या १३३२ मद्य आस्थापनांपैकी निम्मी आस्थापने पूर्ववत खुली करण्यासाठी लवकरच हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे. 

In Goa, half a bar of urbanized villages, liquor shops will get relief | गोव्यात शहरीकरण झालेल्या गावांमधील निम्म्या बार, मद्य दुकानांना दिलासा मिळणार

गोव्यात शहरीकरण झालेल्या गावांमधील निम्म्या बार, मद्य दुकानांना दिलासा मिळणार

Next

पणजी : गोव्यात बारमालक तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानमालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून शहरीकरण झालेल्या गावांमधून जाणाऱ्या महामार्गालगतची सध्या बंद असलेल्या १३३२ मद्य आस्थापनांपैकी निम्मी आस्थापने पूर्ववत खुली करण्यासाठी लवकरच हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे. 
गावांमधून जाणाऱ्या हायवेलगतच्या बंद असलेल्या मद्य आस्थापनांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी पालिकामंत्री फ्रान्सिस डिसोझा, महसूलमंत्री रोहन खंवटे, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई या तीन मंत्र्यांची समिती स्थापन केलेली आहे. या समितीची पहिली बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर वेगाने हालचाली झाल्या असून शहरांपासून जवळ असलेले गाव ज्यांचे शहरीकरण झालेले आहे, अशा गावांमधील बार खुले करण्याची परवानगी सरकारकडून दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत. 
सर्वोच्च न्यायालयाने विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांना निवाड्याव्दारे दिलासा दिलेला आहे. विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांबाबत राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा, सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे त्यामुळे बार्रांचे मालक तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानमालकांमध्ये आशेचा किरण निर्माण झालेला आहे. 
गोव्यात मद्य स्वस्त मिळत असल्याने देशभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत असतात. शेजारी महाराष्ट्र, कर्नाटकातील पर्यटकांची संख्या उन्हाळ्याच्या सुट्टीत लक्षणीय वाढते. किनाºयांवरील शॅकमध्येही तुडुंब गर्दी असते. सध्या देशी पर्यटकांचा मोसम असून लवकरात लवकर जर का सरकारकडून परवानगी मिळाली तर या मोसमात थोडेफार आर्थिक उत्पन्न होईल या आशेवर मद्य व्यावसायिक आहेत. 
राजधानी शहरापासून जवळ असलेले पर्वरी तसेच अन्य भागांचे शहरीकरण झालेले आहे. या भागातील मद्य आस्थापनांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उसगांव, खांडेपार, धारबांदोडा, मोलें, पोळें, धारगळ या भागात जास्तीत जास्त मद्य आस्थापने आहेत. 
राज्यात राष्ट्रीय महामार्ग पुढीलप्रमाणे जातात. एनएच १७ - पेडणे, म्हापसा, पणजी, मडगांव, कुंकळ्ळी, काणकोण असा आहे. एनएच १७ ब - वेर्णा, दाबोळी, वास्को असा आहे. एनएच ४ अ - पणजी, जुने गोवे, फोंडा, मोलें महामार्गावर जुने गोवें तसेच म्हार्दोळ, कुंडई, तिस्क, उसगांव व मोलेपर्यंत आहे. 
अस्नोडा-कासारपाल- दोडामार्ग, साखळी-पर्यें-केरी-चोर्ला, बोरी-शिरोडा-पंचवाडी-सावर्डे-सांगे-पाटयें, धारबांदोडा-सावरगाळ-सावर्डे-कुडचडें, मडगांव-नेसाय-सां जुझे आरियल-चांदोर-कुडचडें, कुचेली-थिवी-अस्नोडा-मुळगांव-डिचोली-साखळी-होंडा-वाळपई, होंडा-वेळगें-पाळी-उसगांव-पिळयें आणि  फोंडा-बोरी-राय-आर्लेम्-मडगांव हे आठ राज्य महामार्ग आहेत. 
पालिका क्षेत्रांमधील बार तसेच मद्य विक्री करणारी दुकाने याआधी खुली झालेली आहेत. 
 

Web Title: In Goa, half a bar of urbanized villages, liquor shops will get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.