Goa: डयुटीवरील पोलिसांवरच उगारला हात, एकाला अटक; अन्य एक फरार

By सूरज.नाईकपवार | Published: February 6, 2024 10:57 AM2024-02-06T10:57:22+5:302024-02-06T10:57:43+5:30

Goa Crime News: डयुटीवरील पोलिसांवरच हात उगारण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सावियो कार्दोज याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथिदार जीझस हा सद्या फरार आहे.

Goa: Hands raised on police on duty, one arrested; Another absconding | Goa: डयुटीवरील पोलिसांवरच उगारला हात, एकाला अटक; अन्य एक फरार

Goa: डयुटीवरील पोलिसांवरच उगारला हात, एकाला अटक; अन्य एक फरार

- सूरज नाईकपवार 
मडगाव - डयुटीवरील पोलिसांवरच हात उगारण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सावियो कार्दोज याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथिदार जीझस हा सदया फरार आहे. त्याचा शोध चालू असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली. संशयितांनी पोलिसांना मारहाण करताना पीसीआर व्हॅनचा अँंटिना व तसेच एकाच्या मोबाईलचीही मोडतोड केली. भांदसंच्या ३५३,३२३,४२७,५०४, ५०६, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३ (२) अंतर्गंत पोलिसांनी वरील प्रकरणी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपा देईकर पुढील तपास करीत आहेत.पोलिस शिपाई नवनाथ नाईक हे तक्रारदार आहेत. सोमवार दि. ५ रोजी कोलवा येथे भांडण सुरु असल्याची तक्रार पोलिसांच्या पीसीआर व्हॅनला मिळाली होती. माहितीची दखल घेउन पोलीस तेथे गेले असता, संशयितांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली तसेच धमकीही दिली.

Web Title: Goa: Hands raised on police on duty, one arrested; Another absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.