गोवा : डेंग्यूविषयी आरोग्य खाते राबविणार खास माेहिम, कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 04:00 PM2024-01-29T16:00:41+5:302024-01-29T16:10:35+5:30

आरोग्य खाते डेंग्यूविषयी जनजागृती वाढविण्यासाठी आणखी सक्रिय झाले आहे.

Goa Health department will implement special campaign on dengue training will be given to employees | गोवा : डेंग्यूविषयी आरोग्य खाते राबविणार खास माेहिम, कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

गोवा : डेंग्यूविषयी आरोग्य खाते राबविणार खास माेहिम, कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

नारायण गावस

पणजी: आरोग्य खाते डेंग्यूविषयी जनजागृती वाढविण्यासाठी आणखी सक्रिय झाले आहे. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत तेेथे आरोग्य कर्मचारी लोकांना घेऊन जनजागृती करणार आहे. ज्या भागात गेल्या वर्षी रुग्ण आढळून आले हाेते तेथे पुन्हा पावसाळ्यात डेंग्यू आढळू नये यासाठी खास माेहीम आयोजित केली जाणार आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी अचानक डिचाेली परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. पावसाळा नसला तरी साठवलेल्या टाकीच्या पाण्यात हे डेंग्यूचा पसार झाला होता. या विषयी या लोकांना सांगूनही तेथे पाणी साचविण्यात आले हाेते. पण आता आरोग्य कर्मचारी या ठिकाणी फवारणी व अन्य जनजागृता करुन आता पूर्णपणे नियंत्रणात आणले आहे. काही लोकांना सांगूनही ते आपल्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचवून ठेवतात तसेच आपल्या पाण्याची टाकीची साफसफाई करत नाही.  म्हणून डेंग्यूचा पसार होत आहे, असे डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या.

कामगार लोकवस्तीत डेंग्यूची लागण

राज्यात सध्या डेंग्यूचे लागण होत आहे ती जास्तीत जास्त कामगार लोकवस्तीत हाेत आहे. परप्रांतीय कामगार आहे जे बांधकाम क्षेत्र आहे. अशा ठिकाणी डेंग्यूचा पसार वाढतो. काही कामगार हे बाहेरुन डेंग्यूचा ताप घेऊन ते राज्यात येत असतात. त्यामुळे  अशा वेळी डेंग्यूवर नियंत्रण आणणे आणखी कठीण जाते.  तरीही खात्याचे कर्मचारी कामगार लोकवस्तीत जाऊन त्यांना जागृत करत आहेत, असे डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या.

शहरी भागात काही हॉटस्पॉट

राज्यात ग्रामीण भागात डेंग्यूचा पसार झाला नाही. शहरी भागात काही ठिकाणी डेंग्यूचे  रुग्ण अजून आढळून येत आहेत. या म्हापसा करासवाडा, वास्को वाडे, मडगाव, चिंबल अशा काही भागात हे रुग्ण आढळून येत आहेत. या परिसरात जास्त प्रमाणात कामगार लाेक राहतात. झाेपडपट्टीच्या जागेत अशा ठिकाणी हे डेंग्यू वाढत आहे, असेही डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.

Web Title: Goa Health department will implement special campaign on dengue training will be given to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा