गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांविरुद्ध सभापतींकडे अपात्रता याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:30 PM2017-08-01T23:30:50+5:302017-08-01T23:31:13+5:30

उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर ८ रोजी सुनावणी

Goa healthminister to face disqualify petition | गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांविरुद्ध सभापतींकडे अपात्रता याचिका

गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांविरुद्ध सभापतींकडे अपात्रता याचिका

Next

पणजी : गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर अपात्रता याचिका प्रलंबित असताना व तिथे सुनावणी सुरू असताना सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी मंत्री विश्वजित यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका सभापतींना सादर केली आहे.
काँग्रेस पक्षाने यापूर्वी ज्या मुद्द्यांवर अपात्रता याचिका सादर केली आहे, काहीशा त्याच मुद्द्यांवर गावकर यांनीही अपात्रता याचिका सभापतींना सादर केली आहे. काँग्रेसने सभापतींना आपली याचिका सादर केली नव्हती. गावकर यांच्या याचिकेच्या अनुषंगाने सभापतींनी नोटीस जारी करून येत्या शुक्रवारी विश्वजित राणे यांना सुनावणीसाठी बोलावले आहे. आमदार प्रसाद गावकर हे सत्ताधारी भाजपप्रणित आघाडीचा भाग आहेत.

Web Title: Goa healthminister to face disqualify petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.