Goa: गोव्यात ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे घरबसल्या मतदान सुरू
By किशोर कुबल | Published: April 29, 2024 01:36 PM2024-04-29T13:36:07+5:302024-04-29T13:37:01+5:30
Goa Lok Sabha Election 2024: ५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मिळून २०,९२५ मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची प्रक्रिया आज सोमवारपासून राज्यात सुरु झालेली आहे. ३ मे पर्यंत पाच दिवस हे मतदान चालणार आहे.
- किशोर कुबल
पणजी - ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मिळून २०,९२५ मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची प्रक्रिया आज सोमवारपासून राज्यात सुरु झालेली आहे. ३ मे पर्यंत पाच दिवस हे मतदान चालणार आहे.
गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार असले तरी ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी घरबसल्या मतदानाची विशेष व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने नेमलेले पथक नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर भेट देतात व मतदान पत्रिकेवर संबंधित मतदाराच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करुन घेतात.
आज सकाळपासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिकृत माहितीनुसार ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ११,५०२ मतदार राज्यात आहेत. उत्तर गोव्यात ही संख्या ६,२८६ तर दक्षिण गोव्यात ५,२१६ आहे. तर एकूण ९४२३ दिव्यांग मतदार आहेत. उत्तर गोव्यात ४,९७७ तर दक्षिण गोव्यात ४,४४६ दिव्यांग मतदार आहेत.