Goa: आरटीआयअंतर्गत अपूर्ण माहिती: गोमेकॉच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा
By पूजा प्रभूगावकर | Published: September 26, 2023 12:40 PM2023-09-26T12:40:34+5:302023-09-26T12:40:56+5:30
Goa News: आरटीआय अंतर्गत मागवलेली माहिती अपूर्ण स्वरुपात दिल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) च्या माहिती अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोवा राज्य माहिती आयोगाने ही नोटीस त्यांना बजावली आहे.
- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी - आरटीआय अंतर्गत मागवलेली माहिती अपूर्ण स्वरुपात दिल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) च्या माहिती अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोवा राज्य माहिती आयोगाने ही नोटीस त्यांना बजावली आहे.
गोमेकॉ विषयी अनिश बकाल यांनी आरटीआयच्या कलम ६ (१) अंतर्गत ठरावीक माहिती मागवली होती.मात्र त्यांनी मागितलेली ही माहिती अपूर्ण स्वरुपात असल्याचे अर्जदाराच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी ही बाब गोवा राज्य माहिती आयोगाच्या लक्षात आणून दिल्यानंतर आरटीआयच्या कलम २० अंतर्गत गोमेकॉचे माहिती अधिकारी दत्ताराम सरदेसाई यांना नोटीस बजावली.
गोवा राज्य माहिती आयोगाचे आयुक्त संजय ढवळीकर यांनी ही कारवाई केली. बकाल यांना सरदेसाई यांनी अपूर्ण माहिती दिल्यानंतर बकाल यांनी आयोगाकडे त्याविरोधात अपील दाखल केले होते. त्यानुसार आयोगाने त्यावर सुनावणीसाठी माहिती अधिकारी सरदेसाई यांना बोलावले होते. मात्र त्यांनी आयोगा समोर येण्यास टाळाटाळ केली असे आयुक्त संजय ढवळीकर यांनी सांगितले.
गोमेकॉचे माहिती अधिकारी सरदेसाई यांनी आरटीआय अंतर्गत दिलेली माहिती अपूर्ण स्वरुपात देणे अयोग्य नाही. त्यामुळे पुढील १५ दिवसांत मागितलेली माहिती मोफत दिली जावी अशीही सूचना या कारणे दाखवा नोटीसमध्ये केली.