गोव्यात डिझेल 2 रुपयांनी महागले, नवा दर 64 रुपये 66 पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 06:20 PM2020-05-09T18:20:15+5:302020-05-09T18:20:35+5:30
काही दिवसांपूर्वी सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 21 टक्क्यांवरून 25 टक्क्यांर्पयत वाढविला. डिझेलवरील मूल्यवर्धीत करातही सरकार वाढ करील असे लोकांना वाटत नव्हते.
पणजी : राज्यात डिझेल प्रति लिटरमागे दोन रुपयांनी महागले आहे. डिझेलवरील मूल्यवर्धीत कर 18 टक्क्यांवरून सरकारने 22 टक्क्यांपर्यंत वाढविला. परिणामी राज्यात आता डिङोलचा दर 64 रुपये 66 पैसे झाला आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 21 टक्क्यांवरून 25 टक्क्यांर्पयत वाढविला. डिझेलवरील मूल्यवर्धीत करातही सरकार वाढ करील असे लोकांना वाटत नव्हते. कारण सध्या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या खूप कमी झालेली आहे. लॉक डाऊनच्या काळात डिझेलची विक्री 4० टक्क्यांपर्यंत खाली आलेली आहे. पेट्रोलची विक्री 25 टक्क्यांर्पयत खाली आली आहे. डिझेलवरील व्हॅट वाढविल्याने राज्याच्या काही भागांत पेट्रोल पंप मालकांनी डिझेलवर 2 रुपये 5 पैसे वाढविले आहेत तर काही भागांमध्ये 2 रुपये वाढविले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात डिझेलचा दर प्रति लिटर 62 रुपये 61 पैसे होता.
गोवा हे काही वर्षापूर्वी अत्यंत कमी दरात पेट्रोल व डिझेल विक्रीसाठी प्रसिद्ध होते. 2012 साली देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोल प्रति लिटर 16 रुपयांनी स्वस्त झाले होते. अजुनही पेट्रोल व डिङोलचे दर शेजारील राज्यांच्या तुलनेत गोव्यात कमी आहेत. पण पूर्वीसारखे ते एकदम कमीही राहिलेले नाहीत. 2०17 सालापासून सरकार पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट वाढवत गेले व दरही वाढत राहिला. सरकारच्या तिजोरीत सध्या पैसाच कमी आहे. दर महिन्याला सरकार शंभर ते दोनशे कोटी रुपयांचे कर्ज घेत आहे. महसूल प्राप्तीचे वेगळे कोणते उपाय सरकारला सापडलेले नाहीत. त्यामुळे डिझेलवरील व पेट्रोलवरील व्हॅट वाढवत राहणे हाच सोपा मार्ग प्रशासकीय पातळीवरील काही अधिकाऱ्यांना वाटू लागला आहे. सरकारच्या नव्या निर्णयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी टीका केली आहे.
वॉशिंगटन पोस्ट की रिपोर्ट के मुताबिक कोरोना वायरस की वजह से तेल की खपत कम होने के बाद सऊदी अरब ने तेल उत्पादन बढ़ा दिया था. इसकी वजह से तेल उत्पादन करने वाली अमेरिकी कंपनियों पर दबाव बढ़ गया था. पिछले महीने ट्रंप ने सऊदी अरब को तेल का उत्पादन कम करने के लिए समझाने का प्रयास किया था.