Goa: जुन्या पुलांच्या कठड्यांची पाहणी करा: आमदार मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 07:45 PM2023-08-03T19:45:47+5:302023-08-03T19:46:22+5:30
Goa: सध्या राज्यात अपघाताच्या घटना वाढत आहेत. अनेक अपघात हे पुलाचा कठडा तोडून गाड्या नदीत पडून झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जुन्या पुलाचे कठडे दुरुस्त करणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार मायकल लाेबो यांनी अधिवेशनात केली.
- नारायण गावस
पणजी - सध्या राज्यात अपघाताच्या घटना वाढत आहेत. अनेक अपघात हे पुलाचा कठडा तोडून गाड्या नदीत पडून झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जुन्या पुलाचे कठडे दुरुस्त करणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार मायकल लाेबो यांनी अधिवेशनात केली. गेल्या काही वर्षात राज्यात अपघात वाढत आहे. जे जुने पुल आहेत त्यांचे कठडे अगदी धोकादायक आहेत. ही ४० ते ५० वर्षे झालेली जुनी पुलांचे कठडे धोकादायक आहेत. त्यामुळे गाड्यांची टक्कर बसल्यावर गाडी सरळ नदी नाल्यात पडते कठड्याला सुरक्षा नाही. नुकतीच सांगे येथे घडलेली ही दुर्घटना खूपच वाईट आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी लक्ष घालावे. राज्यातील अशा सर्व पुलांची पाहणी करुन हे कठडे सुरुक्षित करावे. सर्व पंचायती तसेच नगरपालीका सदस्यांनी सार्वजनिक मंत्र्यांच्या हे लक्षात आणून द्यावे, असेही आमदार लोबो म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चांगले काम करत आहे. तो आपल्याला अनेक तास काम करतो. त्यामुळे अशा समस्या त्यांच्या लक्षात आणून द्याव्या. रस्ते चांगले केले आहे. पण सध्या पाण्याची समस्या माेठी आहे. लोकांना निदान २ तास प्रती दिन पाणी मिळणे गरजेचे आहे. पण तेवढे पाणीही काही लाेकांना मिळत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी लक्ष घालावे असेही यावेळी मायकल लोबो म्हणाले.